आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापूर येथील विजयलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या दहा महिलांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 1500 मीटर उंचीवरील राजगड किल्ला सर केला. गडावर चढण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता या महिलांनी 25 जानेवारी रोजी हा किल्ला सर केला. या महिलांसोबत दोन चिमुकल्या मुलीही या मोहिमेत सहभागी होत्या. किल्ल्यांची रचना कशी असते, छत्रपतींच्या कार्याची महती त्यांनी जाणून घेतली.
24 जानेवारी रोजी सकाळी या महिलांनी पुण्यात प्रवेश केला. तेथून पुढे ते राजगडाच्या दिशेने निघाल्या. राजगड हा शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील एक महत्त्वाचा किल्ला होता. गडावरील पद्मावती मंदिरात त्यांनी एक दिवस मुक्काम केला. तिसर्या दिवशी त्या गडावरून खाली उतरल्या. पुण्यापासून 60 किलोमीटरवर राजगड किल्ला आहे. महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य येथे होते. आग्य््राहून सुटका, अफझलखानाचा वध, पुरंदरचा तह, पन्हाळगडाचा तह या ऐतिहासिक घटनांशी राजगडाचा संबंध आहे.
ही सुवर्णसंधीच
अशा गडांवर चढण करणे म्हणजे एक सुवर्णसंधीच असते. त्याद्वारे इतिहास जाणून घेता येतो. निसर्ग व इतिहास पुरुषांच्या ऐतिहासिक विभूतींच्या कार्याची ओळख होते.’’ अभिंजली जाधव, अध्यक्ष, विजयलक्ष्मी संस्था
..या हिरकण्या
अभिंजली जाधव, मृणालिनी मोरे, अंजली धनके, अंजली दळवी, पूनम धस, युगंधरा दळवी, संगीता भगरे, मीना सोनवणे, निशा भगरे यांनी राजगड सर केला. त्यांच्यासोबत मनाली जाधव व मिताली धस या चिमुकल्यांनीही राजगड सर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.