आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री ढोबळे जाणून घेणार नागरिकांच्या व्यथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाणी आदीबाबत मागणी व अडचणी असल्यास त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्यास आपल्याला भेटावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले आहे.

सोमवारी (दि.28) सकाळी 9 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान इंदिरा गांधी पार्क स्टेडियमखालील गाळ्यामध्ये असलेल्या संपर्क कार्यालयात नागरिकांनी समक्ष भेटावे. ज्यांना समक्ष भेटणे शक्य नाही, त्यांनी तक्रार अथवा मागणीचे निवेदन दोन प्रतीमध्ये आणून देण्याचे आवाहन ढोबळे यांनी केले आहे. एकीकडे अधिकारी ऐकत नाहीत, असे जाहीरपणे सांगणारे पालकमंत्री ढोबळे आता नागरिकांच्या तक्रारीनुसार अधिकार्‍यांवर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे. हे कळण्यासाठी 28 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विशेष म्हणजे दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात सर्वाधिक असताना पालकमंत्री ढोबळे मात्र शहरातील संपर्क कार्यालयात नागरिकांची गार्‍हाणी ऐकणार आहेत. पालकमंत्र्यांना भेटायला अथवा निवेदन देण्यासाठी ग्रामस्थांना करमाळा, माळशिरस आदी टोकाच्या गावातून यावे लागणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्याबाबत संदिग्धता आहे.