आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Gordian Minister Luxman Dhobale Comment On Water Issue

हिप्परग्याचे पाणी: पालकमंत्री लक्ष्मण ढोबळेंची बदलती वक्तव्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहराचा हिप्परगा तलावातील पाणीपुरवठा बंद करण्याच्या मुद्दय़ावर पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सोमवारी घेतलेली बैठक कोरडीच ठरली. त्यातून ठोस तोडगा निघू शकला नाही. हिप्परगा तलावातील पाणी बंद केले आहे वा नाही किंवा कधी बंद होईल हेही स्पष्ट होऊ शकले नाही.

हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी खालावली असून ते पाणी परिसरातील 11 गावांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय र्शी. ढोबळे यांनी घेतला होता. त्यामुळे त्यातून शहरास होणारा दहा एमएलडी (दहा लाख लिटर दररोज) पाणीपुरवठा बंद करण्याविषयी र्शी. ढोबळे यांनी सांगितले होते. त्यावरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर पर्याय शोधण्यासाठी र्शी. ढोबळे यांनी महापालिका अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. हिप्परगा तलावातून पाणी देणे बंद केले नाही, असे र्शी. ढोबळे यांनी स्पष्ट केले. हिप्परगा तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना पाणीपुरवठय़ासाठी पर्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

हिप्परगा तलावातून पाणी देणे बंद केल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. त्यामुळे तो थांबवू नये, अशी भूमिका महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मांडली. गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी शहरातील खासगी 20 विंधन विहिरींचे अधिग्रहण करावे. त्यातून पाण्याचा पुरवठा करावा, असा पर्याय त्यांनी पुढे ठेवला. हिप्परग्याचे पाणी राखून ठेवण्याची 11 गावांची मागणी नाही, हेही स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री ढोबळे यांनी ठोस निर्णय न घेता विषय अधांतरी ठेवला आहे. शहरातील 20 विंधन विहिरीची यादी सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी दिली. या वेळी महापौर अलका राठोड, पालिका सभागृह नेते महेश कोठे आदी उपस्थित होते.

‘दक्षिण’च्या 11 गावांसाठी रोज दोन लाख लिटर पाणी
कुंभारी व कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे हिप्परगा तलावातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील 11 गावांसाठी दररोज दोन एमएलडी (दोन लाख लिटर) पाणी उचलण्यात येते. त्या योजनेच्या पाण्यातून 38 हजार लोकांची तहान भागवण्यात येते.
कुंभारी योजनेवरील गावे : कुंभारी, मुळेगाव तांडा, मुळेगाव, बोरामणी, दोड्डी, दर्गनहळ्ळी, कर्देहळ्ळी
कासेगाव योजनेवरील गावे : कासेगाव, उळेवाडी, वडजी, वरळेगाव.
उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ गावांच्या ग्रामपंचायत पाणीपुरवठय़ाच्या पाझर विहिरी तलावाच्या लाभक्षेत्रात आहेत.