आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरातील खंडपीठासाठी सर्व नेत्यांना भेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी वकिलांची आहे. याबरोबरच पुणे, कोल्हापूर वकीलही मागणी करीत आहेत. पण सोलापूरलाच हे खंडपीठ होणे किती गरजेचे आहे, याबाबत वकिलांच्या प्रतिक्रिया.

सर्व नेत्यांची बैठक
संतोष न्हावकर, बार असोसिएशन, उपाध्यक्ष : लवकरच आम्ही एक कार्यक्रम घेणार आहे. त्यात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना एकत्र बोलावून खंडपीठ होण्यासाठी मागणी करणार आहोत. राजकीय पाठिंबा मिळाल्यास पुढील कार्यवाहिला गती येईल. याशिवाय आपल्या जिल्ह्यातील दोन तालुक्यांच्या वकिलांनी कोल्हापूरला पाठिंबा दिला आहे. त्यांचे मत जाणून घेऊन आम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.

मध्यवर्तीचा फायदा
अँड. विक्रांत फताटे : भौगोलिकदृष्ट्या सोलापूर हे मध्यवर्ती केंद्र आहे. राजकीय नेते, वकील मंडळींनी एकत्र येऊन व पाठपुरावा केल्यास खंडपीठ सोलापूरला होऊ शकते. मुंबईला जाणे गैरसोयीचे आहे. पक्षकारांना आर्थिक झळ सोसावी लागते. इथेच खंडपीठ व्हावे ही आग्रही मागणी आहे.

राजकीय पाठबळ
अँड. किरण सराटे : राजकीय पाठबळ आणि वकिलांचा प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास खंडपीठ होण्यात अडचण येणार नाही. सोलापूरचे सर्वाधिक खटले पेंडिंग आहेत. त्यासाठी इथेच खंडपीठ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

सोलापूरचे खटले जास्त
अँड. एच. एच. बडेखान : सोलापूरचेच खटले सर्वाधिक आहेत. सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद शहरांसाठी आपले शहर जवळचे आहे. त्यामुळे इथेच खंडपीठ व्हावे. फिरते खंडपीठ तरी सुरू करावे.

गैरसोयींचा विचार व्हावा
अँड. संजय माने : रेल्वे सुविधा आहे. विमानतळ होत आहे. दळणवळण सुविधा चांगल्या असल्यामुळे इथेच खंडपीठ व्हावे. जिल्ह्यात तीन सेशन कोर्ट आहेत. अपील करायचे म्हटले तर मुंबईला जावे लागते. पक्षकार, वकिलांना गैरसोयीचे आहे.