आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात खंडपीठ खेचून आणा; कॉ. आडम बरसले; अन्यथा मते मागू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय सामान्यांना सहज न्याय मिळणार नाही. न्यायासाठी तिष्ठत बसावे लागणे याचा दुसरा अर्थ न्याय नाकारला जाणे असाच असतो. सोलापूरचे दोन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या पुढाकाराने सोलापूरला खंडपीठ आणल्याशिवाय स्वस्थ बसू नये. अन्यथा आगामी निवडणुकीत त्यांनी आम्हाला मत मागू नये, असा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी मोर्चेकर्‍यांच्या वतीने दिला.

सोलापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर करावे, यासाठी मंगळवारी बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकील, सर्वपक्षीय नेते, संघटनांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. त्यावेळी सभेत र्शी. आडम मास्तर बोलत होते. सरकार म्हणते झटपट न्याय देणार. इकडे हायकोर्टात सोलापूरच्या दीड लाख केसेस पेंडिंग आहेत, कसा न्याय मिळणार. यासाठी आगामी काळात आणखी लढा तीव्र करू आणि खंडपीठ खेचून आणू असे ते म्हणाले.
कुठल्याही स्वरूपाचे आंदोलन करू पण खंडपीठ आणूच, असे मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे म्हणाले.

नेत्यांची रंगली भाषणे
या आंदोलनाला रिपाइंचा पाठिंबा आहे. खंडपीठाच्या निकषात आपण बसतोय, त्यासाठी प्रयत्न करूयात, असे रिपाइं नेते राजा सरवदे म्हणाले.

हे वकील अग्रभागी
शिवशंकर घोडके, मिलिंद थोबडे, लक्ष्मण मारडकर, रजाक शेख, विद्यावंत पांढरे, महेश जगताप, स्वाती बिराजदार, विक्रांत फताटे, नागेश खिचडे, एच. एस. बडेखान, जहीर सगरी, अभिजित कट्टे, राम कदम, सुहास कोरे, संतोष पाटील, गौतम खरात, महेश सोलनकर, रईसा मदनी, नंदिनी किणीकर, जयश्री सूर्यवंशी यांच्यासह इतर वकील सहभागी होते.

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक आरिफ शेख, तौफिक हत्तुरे, फिरदोस पटेल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, कामगार नेते अशोक जानराव, सुरेश फलमारी, शिवानंद पाटील, शांतीकुमार नागटिळक, शंकर जाधव, युवराज चुंबळकर, बबलू गायकवाड आदी.

माईकची खेचाखेची
मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत बोलण्यासाठी राजकीय नेत्यांनी मी अगोदर का तू अगोदर बोलणार अशी जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती. चक्क माईकची खेचाखेचीच सुरू होती. भाषण केल्यानंतर काहींनी तेथून लागलीच काढता पाय घेतला.