आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील चार महिन्यांत फक्त १.३१ कोटी दंडाची वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचा दगडखाणी मोजणीचा पॅटर्न राज्यभरात लागू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाबरोबरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. यामुळे सोलापूर पॅटर्नचे राज्यभर कौतुकही झाले. मात्र त्यानंतर दगडखाणी मोजणीमध्ये अनधीकृत ठरलेल्या खाणी व त्यांना ठोठावलेला दंडवसुलीची मोहीम खूपच थंडावलेली दिसून येते. गेल्या चार महिन्यांत १३२ कोटी रुपयांपैकी फक्त १ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची मािहती िजल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे फक्त चारच तालुक्याने दंड वसुलीची मोहीम राबवण्यात
आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १५० दगडखाणींना रॉयल्टीसह १३२ कोटीचा दंड ठोठावला होता. यामध्ये दंड वसुलीचे चार प्रकार करून दंड वसुलीचे आदेश संबंिधत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार जुलैअखेरपर्यंत उत्तर सोलापूर ९ लाख २३ हजार, दक्षिण सोलापूर ५ लाख ३० हजार, बाशी ८० लाख, अक्कलकोट ३७ लाख अशी एकूण १ कोटी ३१ लाख रूपयांची वसुली केल्याचे गौण खनिज कार्यालयाकडून सांगण्यात आले. इतर तालुक्यामध्ये वसुलीसंबंधीच अधिकारीच सुस्त असल्याचे िचत्र असल्याने दंडवसुलीसंबंधी कारवाई झाली नाही.
अनधीकृत दंड खाणीप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना स्वतंत्रपणे आदेश काढून दरमहा खाणी तपासून करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र दंडवसुलीवरून किती तहसीलदारांनी दगडखाणींची तपासणी केली आणि किती अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. दंड वसुलीचे आदेश दिल्यानंतर ज्या खाणचालकांनी अनधीकृत दगडखाणीतून उपसा केला आहे, त्या दगडखाणी सील करण्याचे आदेश दिले, त्यानुसार तहसील कार्यालयाने जिल्ह्यातील ७० पेक्षा अधिक दगडखाणी सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
प्रांताधिकाऱ्यांची बैठक
दगडखाणींना केलेल्या दंडाच्या वसुलीसंदर्भात तहसीलदार व प्रांताधिकारी यांची बैठक लावली आहे. शिवाय गेल्या चार महिन्यात वसुली का झाली नाही, याचा आढावाही बैठकीत घेण्यात येणार आहे. दंड वसुलीसाठी योग्य ते आदेश बैठकीत देण्यात येतील.
शंकरराव जाधव, महसूल उपजिल्हाधिकारी.