आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होटगी विमानतळावर लवकरच नाइट लॅन्डिंगची सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी विमानतळावर लवकरच नाइट लॅन्डिंगची सोय करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूंनी पापी लाइट्स आणि अन्य लाइट्स बसवणार आहेत. यासाठी 22 लाखांचा खर्च असून तो भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. यामुळे रात्रीच्या वेळी विमान उतरवणे व टेक ऑफ करणे शक्य होणार आहे.

राज्य सरकारने बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी तीन वर्षांची कालर्मयादा दिली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण व महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनी स्थापित विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. बोरामणी विमानतळ स्थापन होईपर्यंत होटगी विमानतळाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध विकासकामे होतील
पंधरा दिवसांत नाइट लॅन्डिंगच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या वतीने होटगी विमानतळावर विविध विकास कामे करण्यात येतील. अनेक कामे प्रक्रियेत आहेत. संतोष कौलगी, व्यवस्थापक, होटगी विमानतळ

3 महिने लागतील
दिल्ली येथील एका खासगी कंपनीला नाइट लॅन्डिंगची यंत्रणा बसवण्यास सांगितले आहे. याच्या निविदा मंजूर होऊन संबंधित कंपनीने 15 दिवसांत नाइट लॅन्डिंगचे काम सुरू करावे, असे आदेश विमानतळ प्राधिकरणाने दिले आहेत. काम पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे.