आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर भूषण’ने आठ विद्यार्थी सन्मानित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्रीवल्लभजी लोणकरजी चंडक कमलाबाई श्रीवल्लभजी चंडक स्मरणार्थ देण्यात येणा ऱ्या सोलापूर भूषण आदर्श विद्यार्थी, विद्यार्थींनी पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी अॅम्फी थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी मंत्री डेव्हलपर्सचे चेअरमन सुशील मंत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, जगदिश पलसे, शीला पत्की, डॉ. गिरीष चंडक, किशोर चंडक, शैलेश चंडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येते. शालेय अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या इतर कला गुणांचा विचारही पुरस्कार देताना करण्यात येतो. आदर्श विद्यार्थी निवड प्रक्रियेत दोनशे गुणांचा फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरुन घेण्यात आला. त्यातून आठ जण आदर्श विद्यार्थी ठरले. याशिवाय स्पर्धेत सहभाग घेण्या ऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्प देवून गौरविण्यात आले.
आठजण ठरले आदर्श
विद्यार्थीगट: प्रथम-मयुर देशपांडे(मेहता प्रशाला), द्वितीय-ऋषभ मेहता (दमाणी प्रशाला), तृतीय-अंकीत चव्हाण(सिध्देश्वर प्रशाला), यशराज उपासे (सिध्देश्वर प्रशाला),
विद्यार्थींनी गट- प्रथम- समृध्दी कुलकर्णी (व्ही. एम. मेहता प्रशाला), द्वितीय- वैष्णवी औरंगाबादकर (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला), तृतीय- श्रेया उस्तुरगे (सिध्देश्वर प्रशाला), ऐश्वर्या चंडक-(एस.आर. चंडक प्रशाला)
सोलापुरातील आठ विद्याथ्यांना सोलापूर भूषण आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सुशील मंत्री, सुरेश काकाणी, जगदीश पलसे, शीला पत्की, डॉ. गिरीष चंडक, किशोर चंडक, शैलेश चंडक आदी.