आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur In Hindu Muslim Unity Was A Step In The Direction Of The

सोलापूरमध्‍ये हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दिशेने पडले एक पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -शहर राष्ट्रवादी काँग् रेस पार्टीच्या वतीने बुधवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरच्या समोरील जागेत मकर संक्रांत व ईद-ए-मिलादच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधवांकरिता स्नेहमेळावा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी आणि शिवअभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर आपले विचार मांडले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी केले.

पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, माजी आमदार युन्नूस शेख, नरसिंग मेंगजी, उपमहापौर हारून सय्यद, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, दयानंद माने, माजी महापौर भीमराव जाधव गुरुजी, डॉ. अजीज नदाफ, सिद्धेश्वर बमणी, अँड. धनंजय माने, प्रा. सुदर्शन देवरकोंडा, डॉ. बशीर परवाज, पेंटप्पा गड्डम, अय्युब कुरेशी, बसवराज स्वामी, सुधाकर इंगळे महाराज, हाजी म. रफिक अडते, दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. शशीकांत हलकुडे, डॉ. गुलाम दस्तगीर शेख, सी. बी. नाडगौडा, सभागृह नेते महेश कोठे, चेतन नरोटे, पीरअहमद शेख आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

विडी, यंत्रमाग कामगार सेल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईद-ए- मिलाद आणि मकर संक्रांत एकत्र साजरी करण्यात आली. अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांनी तीळगूळ वाटप केले.

छप्परबंद समाजाचे आयोजन

सलगरवाडी येथील छप्परबंद समाजाच्या वतीने पैगंबर जयंतीच्या निमित्ताने प्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी अध्यक्ष शब्बीर पिरजादे, नगरसेवक रोटे, माजी नगरसेवक ईब्राहिम बिजापुरे, महम्मद इंडीकर, महम्मद नागराळी, महिबूब कनाळकर, शब्बीर पिरजादे उपस्थित होते.

मिरवणुकीचे स्वागत

ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे दि मुस्लिम को. ऑप. बँक सोलापूर शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी गुलाब पुष्प देऊन थंड पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले.

मीम बॉइस संस्था

मीम बॉइस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मदरसा व शाळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. इम्रान सलीम कुरेशी, इक्बाल मुजावर, फिरोज रेहमान पठाण, मुबशिरीन हबीब नागपूरवाले यांनी क्रमांक पटकवला. पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसेवक पैगंबर शेख आदी उपस्थित होते.

धान्य, साड्या वाटप

जश्ने ए ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी पार्क चौकच्या वतीने चार पुतळा येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गरजूंना धान्य, साड्या, चादरी वाटप करण्यात आले.

रक्तदान शिबिर

शहीद ए टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त सैफुल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तौफिक शेख, अजित बनसोडे, अनिल आबुटे आदी मान्यवरांसह 70 जणांनी रक्तदान केले.

जश्ने इस्लाम कमिटी

पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जश्ने इस्लाम कमिटीच्या वतीने सोशल हायस्कूल येथे रक्तदान आणि खत्ना शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी 80 जणांनी रक्तदान केले तर 90 मुलांचे खत्ना करण्यात आले. या वेळी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष पर्शिम घेतले.

सर्वांना मदत करतो तोच खरा मुस्लिम : काझी

आपल्या व्याख्यानात शहर काझी म्हणाले, इस्लामने नेहमी शांती आणि मानवतेचा संदेश दिला आहे. जो कोणाला त्रास देत नाही आणि नेहमी सर्वांना मदत करतो तोच खरा मुस्लिम आहे. चुकीची माहिती पुरवून तरुण मुलांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुण मुले शिक्षित असतील तर त्यांची कोणी दिशाभूल करणार नाही. या देशासाठी मुस्लिमांनीही रक्त सांडले. त्यामुळे हा देश मुस्लिमांचाही आहे. भारत देशाकडे वाईट नजरेने पाहणार्‍यांना नष्ट करा, अशी प्रार्थना शहर काझी यांनी अल्लाहचरणी केली.

शिवाजी हे इस्लामविरोधी नव्हते : डॉ. शेटे

शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी नसल्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले. शिवरायांच्या दहा अंगरक्षकांमध्ये एक मुस्लिम होता तर अफजलखानासोबत शिवरायांचे काका, मामा आणि मानलेले सासरे होते. शिवरायांना कुराणाची प्रत कुठे आढळली तर ते मोठय़ा आदराने मुस्लिमांपर्यंत पोहोचवत असत. औरंगजेबाने हिंदूंवर झिजीया कर लावला तेव्हा शिवरायांनी कुराणातील तपशील सांगून चूक ध्यानात आणून दिली. असे असताना शिवराय इस्लामविरोधी कसे, असा प्रश्न र्शी. शेटे यांनी उपस्थित केला.