आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Incident: After Three Months Murder Case Disclosed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरातील घटना: तीन महिन्यांनंतर खून प्रकरणाचा उलगडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुळेगाव रस्त्यावरील वळणावर 12 मे रोजी दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी तीन महिन्यांनंतर शेळगी येथील एका तरुणाला सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी दुपारी अटक केली. तो पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना संशय होता. सैफन बाबूलाल तांबोळी (वय 38, रा. कुमारस्वामीनगर, बादशहाभाई जातकर यांच्या घराजवळ शेळगी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शिक्षक सुनील लक्ष्मण गुंड (वय 36), लक्ष्मण मोतीराम देवकर (वय 45, रा. दोघे सुरतगाव, तुळजापूर) या दोघांचा 12 मे 2013 रोजी खून झाला होता. गुंड हे सुरतगावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. देवकर हे शेतकरी होते. दोघेजण सोलापुरात घटनेदिवशी आले होते. मुळेगाव क्रॉस रस्त्यावर दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. गुंड यांचा मोबाइल व अन्य साहित्य घटनेवेळी पळवले होते. चोरीच्या उद्देशाने हा खून झाला की अन्य कारणामुळे याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही.


एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात संशयी
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक आयुक्त जनार्दन तिवटे, पोलिस निरीक्षक अनिल दबडे, साहाय्यक निरीक्षक तय्यब मुजावर, या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात संशयिताला देण्यात आले आहे. आणखी एका संशयिताची चौकशी सुरू आहे.


पूर्वीही चोरीचा गुन्हा
घटनेपासून पोलिस मारेकर्‍यांच्या मागावर होते. गुंड यांच्या मोबाइलवर पोलिसांचे लक्ष होते. तो मोबाइल एका व्यक्तीकडे असल्याची माहिती मिळाली होती. त्या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तांबोळी याचे नाव समोर आले. तो ट्रकचालक असून मुंबई, अजमेर, बंगळुरू या शहरात ट्रक वाहतूक (ने-आण) करतो. त्याच्यावर 2004 मध्ये जेल रोड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल होता. नेमके दोघांचा खून त्याने कशासाठी केला आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.