आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर-जळगाव रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी डॉ. पद्मसिंह पाटीलांचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग होण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. विधानपरिषदेचे आमदार राणा जगजितसिंह यांनी नुकताच हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडला. उस्मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले आहे.

2008-09 मध्ये सोलापूर-जळगाव नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण मंजूर झाले. 2010 मध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल पाठविला. 2986 कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे. राज्य सरकारने 50 टक्के खर्च उचलावा, असे अपेक्षित आहे. राज्य दखल नसल्याने प्रकल्प धूळखात आहे.

लालूंची किमया
रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव 2008मध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. एका दिवसाच्या भेटीत त्यांनी 475 कोटीची कामे मंजूर केली.

पावसाळी अधिवेशनात विषय मांडला. यासंदर्भात मला अजून लेखी उत्तर मिळायचे आहे. आम्ही या प्रकल्पासाठी आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांशीदेखील या प्रश्नी चर्चा करू.
-राणाजगजितसिंह पाटील, आमदार

2010 मध्ये सोलापूर रेल्वे विभागाने या मार्गाचे सर्वेक्षण करून रेल्वे मंत्रालयाला अहवाल पाठवलेला आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक

नवा मार्ग झाल्यास
सध्याचा सोलापूर -जळगाव हा रेल्वेमार्ग 468 किमीचा आहे. नवा रेल्वेमार्ग तयार झाल्यास तो 318 किमीचा असेल. जवळपास 150 किमीचे अंतर कमी होईल. वेळ वाचेल तसेच मराठवाड्यातील तुळजापूर, उस्मानाबाद थेट सोलापूरला जोडले जाईल.

असा असेल हा मार्ग
सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, येडशी, बीड, गेवराई, अंबड, जालना, सिल्लोड, अजंठा, पाहुर असा जळगावपर्यंतचा नवा रेल्वे मार्ग असेल.