आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज मंजूर झाल्याने आजी-माजी महापौरांसह तिघांनी एकदाचे हुश्श केले. त्यांच्या अर्जांना विरोधकांनी हरकत घेतली होती. सोमवारी मंजूर यादी प्रसिद्ध झाली. तीत महापौर अलका राठोड, माजी महापौर आरिफ शेख व माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या गटातील जागांसाठी त्यांनी अर्ज केला आहे. त्यास भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतली. त्यावरील सुनावणी दरम्यान, अँड. मंगला चिंचोळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला दिला. तो स्वीकारत निवडणूक निर्णय अधिकारी अशोक काकडे यांनी हरकती फेटाळल्या. त्यामुळे महापौर राठोड, माजी महापौर शेख आणि माजी सभागृह नेता यांना दिलासा मिळाला. सर्वसाधारण जागेवरून निवडून आल्यानंतर समितीच्या राखीव जागेसाठी अर्ज करता येत नाही, अशी हरकत विरोधकांनी घेतली होती. र्शी. काकडे यांच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज करणार असल्याचे भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले. पहिला अर्ज सही नसल्याने बाद झाल्याने महापौर राठोड संतापल्या होत्या. दुसर्या अर्जावरही विरोधकांनी हरकत घेतली. त्यामुळे सौ. राठोड यांचे समितीतील स्थान अवघड झाले होते.
संभाव्य उमेदवार
पुरुष खुला गट : महेश कोठे (काँग्रेस), सुरेश पाटील (भाजप)
महिला खुला गट : शोभा बनशेट्टी (भाजप), संजीवनी कुलकर्णी (काँग्रेस), सुनीता रोटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ओबीसी पुरुष : आरिफ शेख (काँग्रेस)
ओबीसी महिला : अलका राठोड ( काँग्रेस), रार्जशी कणके (शिवसेना)
अनुसूचित जाती जमाती : देवेंद्र भंडारे (कॉंग्रेस)
हे काढून घेतील?
अश्विनी जाधव (काँग्रेस)
कमरून्निसा शेख (राष्ट्रवादी काँग्रेस)
84 उमेदवारांचे 89 अर्ज
समितीच्या 40 जागांसाठी 85 जणांनी 90 अर्ज केले होते. त्यापैकी महापालिका गटातून महापौर अलका राठोड आणि नगरपालिका गटातून कलावती खंदारे यांनी अर्ज केला होता. त्रुटी असल्याने दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे 84 उमेदवारांचे 89 अर्ज शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या जागेवर हरकती असल्याने त्या जागा बिनविरोध घोषित करण्यात आल्या नाहीत. जिल्हा परिषद गटातून कमल कमळे यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली.
तेरा जणांचे सोळा अर्ज
समितीच्या 40 पैकी 9 जागा महापालिकेच्या सदस्यांसाठी आहेत. त्यासाठी 13 जणांनी 16 अर्ज दाखल केल आहेत. महापौर राठोड यांचा पहिला अर्ज सर्वसाधारण गटातून होता. तो सही नसल्याने बाद झाला. 12 जणांचे 15 अर्ज वैध ठरले. त्यापैकी सुरेश पाटील, शोभा बनशेट्टी आणि रार्जशी कणके यांनी दोन प्रतीत अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्यास 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.