आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍याचे अपहरण फसले; दोघे अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तीन लाख रुपयांसाठी एका व्यापार्‍याचे अपहरण करणार होते. परंतु त्यास कारमधून पळवून नेताना त्याने प्रसंगावधान साधून उडी मारल्यामुळे अपहरणाचा प्रसंग टळला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला घडली.
वीरेश उंबरजे (रा. रमणशेट्टी नगर, शेळगी) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. नासीर काझी (वय 26, रा. बालाजी कॉलनी, बार्शी), संतोष खराडे (वय 37, रा. शिवाजी आखाडा, बार्शी) या दोघांना गुरुवारी रात्री एकच्या सुमाराला अटक झाली आहे. कदम (पूर्ण नाव नाही), कारचालक मोईन शेख (रा. बार्शी) या दोघांना अद्याप अटक नाही.
उंबरजे यांचे मार्केट यार्डात आडत दुकान आहे. तांदूळ खरेदीसाठी काझी याच्याकडून त्यांनी दोन लाख 86 हजार रुपये घेतले होते. ते पैसे दहा जुलै रोजी देण्याचे ठरले होते. मात्र ते पैसे देऊ शकले नाहीत. बुधवारी रात्री काझी याने उंबरजे यांना मार्केट यार्डाजवळील चाचा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बोलावून घेतले. तिथे पैशावरून वाद झाला. त्यानंतर कारमधून (एमएच 13 एसी 6001) उंबरजेंना बार्शीकडे पळवून नेऊ लागले. जुना तुळजापूर नाका येथे आरडाओरड करून गाडीतून हिसका मारून त्यांनी खाली उडी मारली. ते जोडभावी पोलिसात हजर झाले. पोलिसांनी उंबरजे यांची तक्रार नोंदवून घेऊन एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.