आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : लवंगजवळ अपघात; तिघेजण जागीच ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरवर दुचाकीने मागून धडक दिली. यात तीनजण जागीच ठार झाले. अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर लवंगजवळ (सेक्शन 25/4 चौक) येथे शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमाराला अपघात घडला.
याबाबत अधिक वृत्त असे : रोहित दशरथ गोरे (वय 17, रा. एखतपूर, ता. सांगोला) बाबूराव अंगद आरेकर (वय 24, रा. भूम, जि. उस्मानाबाद) व दीपक शिवाजी पवार (वय 30, रा. नातेपुते, ता. माळशिरस) हे तिघे मित्र नातेपुते येथील एका फर्निचरच्या दुकानात कामास होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ते माळीनगर येथील माळीनगर फेस्टिव्हल पाहण्यासाठी मोटारसायकलवर आले होते. फेस्टिव्हल पाहून झाल्यानंतर ते टेंभुर्णी येथे जेवणासाठी गेले होते. परत येत असताना लवंग (सेक्शन 25/4) येथे पंक्चर झालेला उसाचा ट्रॅक्टर (एम.एच. 45 एफ 6811) रस्त्याच्या कडेला उभा होता. रोहित गोरे, बाबूराव आरेकर आणि दीपक पवार हे तिघे मित्र टेंभुर्णीकडून मोटारसायकलवर भर वेगाने येत होते.
उसाच्या ट्रेलरवर त्यांची मोटारसायकल मागून आदळली. तिघांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात हे तिघे मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. या संदर्भात अकलूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.