आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Mahanagarpalika News In Marathi, Divya Marathi

मनपाचा गलथानपणा उघड, अपंगनिधीची तरतुद केलीच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकात अपंगांच्या कल्याणसाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षी नियमाप्रमाणे अपंग सहाय्यता नावाने निधीची तरतूदही करण्यात येते. पण, निधीच खर्च केला जात नाही. काही ठोस कार्यक्रम नसल्याने तरतूद करूनही निधी खर्च केला जात नसल्याचा अनुभव आहे. यंदाच्या अंदाजपत्रकामध्येही अपंगासाठी दीड कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे.

महापालिका अंदाजपत्रकात एक टक्का निधी अपंगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवला जातो. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातही तो ठेवण्यात आला होता. पण, निधी प्रत्यक्षात खर्च झालाच नाही. गेल्या वर्षी मनपाशी संबंध नसलेल्या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. याठिकाणी मनपाने सहप्रयोजक म्हणून निधी दिला. पण, अपंगांसाठी स्वतंत्रपणे कार्यक्रम कधीच घेतले नाहीत. त्यामुळे 2014-15 च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेला दीड कोटीचा निधी खर्ची होईल का? याबाबत शंका आहे. निधीची तरतूद करण्यात येत असतानाही तो खर्ची घालण्यात मनपाची उदासीनता दिसत आहे.
नाव अपंगांचे; लूट मनपाकडून
महापालिका अपंगांच्या नावाने दरवर्षी निधी ठेवते पण ते सोयीनुसार वळते करते. अपंग स्पर्धेच्या वेळी जेवणासाठी खर्च दाखवले होते. त्यावेळी मी विरोध केला होता. त्यानंतर बहुमताने विषय पारित केले. अपंगांच्या नावाने निधी ठेवून खर्च न करणे म्हणजे ही लूट आहे. सुरेश पाटील, स्थायी समिती सदस्य

निधी खर्च होत नाही
अपंगांसाठी शासन निर्णयानुसार महापालिका बजेटमध्ये तरतूद करत नाही. केलेली तरतूद खर्ची टाकत नाहीत. मागील वर्षी मी संघटनेच्या वतीने मनपास पत्र दिले. यावर्षी खर्च नाही केल्यास अपंग मनपात आंदोलन करतील. राजू प्याटी, अध्यक्ष, अपंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था
अपंगांना कार्यक्रम घेणे (10)
शेवया मशीन देणे (15)
तीन चाकी सायकल (15)
भांडी देणे (5)