आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांबाबत नगरसेवकांना जाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मोकाटकुत्र्यांच्या मुद्द्यावर बऱ्याचदिवसांनी नगरसेवक आक्रमक झाल्याचे महापालिका सभागृहात पाहायला मिळाले. शहरवासीयांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत

असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया रखडली असून ती तातडीने सुरू करावी, कुत्रा चावल्यावर उपचारासाठी देण्यात येणाऱ्या सेरम

इंजेक्शनची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. एकूण ५२ विषयांवर मनपा सभागृहात निर्णय घेण्यात आले.

आॅक्टोबर नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा गुरुवारी महापौर सुशीला आबुटे यांनी बोलवली होती. अमृतनगरातील रिक्षा चालक विजय मोरे यांची मुलगी श्रुती हीस मोकाट

कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांना मदत देण्याचा प्रस्ताव नगरसेवक मधुकर आठवले शिवलिंग कांबळे यांनी दिला. मदत देण्यावर सभागृहाचे एकमत झाले. पण मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी नगरसेवक रोहिणी तडवळकर यांनी मांडली. कुत्र्यांचे निर्बिजीकरण, गणना, सेरम इंजेक्शन यावर चर्चा झाली. येत्या १५ दिवसांत गणना सुरू होईल, निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री घेण्यात येईल असे आराेग्य अधिकारी डाॅ. जयंती आडके यांनी सांगितले.