आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा वाय-फाय कॅम्पस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डफरीन चौकातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची दिमाखदार कॅम्पस पाहायलाच हवा. बांबूचे बेट आपल्या स्वागतासाठी अगदी प्रवेशद्वारालगतच उभे असते. विपूल हिरवी वृक्षसंपदा येथे आहेच. हिरवळीचा भाग अभ्यास करण्यासाठीही राखून ठेवलाय. तुम्ही कॅम्पसमधील हिरवळीवर बसून किंवा दाट झाडांच्या सानिध्यात बसून अनेकदा अभ्यास केला असाल. गुरुवारी कॅम्पसमध्ये फेरफटका मारताना एमआयएममधील काही विद्यार्थी लॅपटॉपवर अभ्यास करत बसलेले दिसून आले. पण, कॅम्पसमध्ये वाय फायचा उपयोग करत अभ्यास करण्याचा आनंद तुम्ही कधी घेतलाय? तो अवर्णनीय आहे, असे मत एमआयएम कॅम्पसमधील एमबीए विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कॅम्पसमधील हे उत्साही विद्यार्थी कट्टय़ावर आहेत तरीही अभ्यासात मग्न असल्याचे चित्र बहुतांश कॅम्पसमध्ये फार विरळ असले तरी आश्वासक असते. एमआयएममध्ये नेहमी हे चित्र दिसून येते, असे संचालक वैद्य यांनी सांगितले. अभ्यास करण्याच्या अनेक तर्‍हा कट्टय़ावर दिसून येतात. काही गच्चीवर चालत चालत अभ्यास करताना दिसून येतील. हेडफोनवर गाणी ऐकत कधी अभ्यास केलात का? अनेकजण तसे करतात. काही जण मस्त गप्पा मारत अभ्यास करतात. समोर एमटीव्ही, व्हीटीव्हीचा ढणढणाट सुरू असतानाही अनेकांना अभ्यास करता येतो बरं का? जाऊ द्या आजचा विषय तो नाही. तर मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमधील एमबीएचे विद्यार्थी कॅम्पसमध्ये वाय फायचा उपयोग करून अभ्यास करताना दिसून आले. त्यांच्याकडूनच एमबीए अभ्यासक्रम आणि सध्याच्या बदलत्या ट्रेंडविषयी घेतलेल्या या निवडक प्रतिक्रिया.

रश्मी आगरकर : ड्युअल स्पेशलायझेशनमुळे चांगला स्कोप मिळतो. एचआरमध्ये करिअर करण्याला प्राधान्य राहील. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांचा समावेश एमबीए अभ्यासक्रमात आहे. अतिशय व्यापक असे एमबीएचे शिक्षण सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाद्वारे मिळते. बदलत्या ट्रेंडनुसार माहिती तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान संपादन महत्त्वाचे आहे.

र्शुतिका ढोले : एमबीए विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील नवनवीन गोष्टींची ओळख करून दिली जाते. यात केस स्टडी, सेमीनार, एक्स्पर्ट लेक्चर यांचा समावेश आहे. वाय फायचा खूप उपयोग होतो.

सुधीर चौगुले : एमबीए अभ्यासक्रम इतर शिक्षणापेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. संगणकीय अभ्यासक्रम उदा. ईआरपी - सॅप, सेक्युरिटी, अँटिट्यूट असे सर्वांगीण शिक्षण घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरते.

अनुराग पुजारी : मार्केटिंग क्षेत्रात विविध व्हरायटी व स्कोप आहे. येथे व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध विषयांवर परिसंवाद व कार्यशाळा घेण्यात येते. एमबीए अभ्यासक्रम संगणक ज्ञानाशिवाय अपुरा आहे.

भावेशा पटेल,
एमबीए 1 :
हा अभ्यासक्रम केवळ बिझनेस रिलेटेड आहे. म्हणूनच प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. केवळ थेरॉटिकल नॉलेजपेक्षा ते इंडस्ट्रीमध्ये जास्त उपयुक्त आहे.

एमआयएममधील विद्यार्थी स्नेहल पाटील, सुप्रिया स्वामी, पूनम गायकवाड, सविता माने, रश्मी आगरकर, अनुराग पुजारी, सचिन अवस्तिनी, पल्लवी सोमशेट्टी, र्शुतिका ढोले, सुधीर चौगुले, वीरप्पा सोट्टी, आनंद मोटगी, पूनम पवार, शिल्पा आळंगे, ज्योती बिराजदार, भावेशा पटेल, नमिता गंभीरे, रसिका देगावकर आदी.