आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागवल्या मार्शल लॉ काळातील आंदोलनाच्या स्मृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मार्शल लॉ’ दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा उत्तर सोलापूर, स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव जन्मशताब्दी समिती आणि महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरुवात झाली. मेकॅनिक चौकातील स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला. या वेळी महापौर अलका राठोड, माजी आमदार निर्मला ठोकळ, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, सिद्धाराम चाकोते, सचिन ठोकळ, शिल्पा ठोकळ आदी उपस्थित होते. निर्मला ठोकळ प्रशालेचे विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.