आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर हे उर्दू भाषेचे केंद्र होईल : बशर नवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उर्दूप्रेमी फक्त दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद आदी ठिकाणीच आहेत असे वाटत होते. परंतु सोलापूर शहर तुलनेत मागे नाही. त्यामुळे भविष्यात सोलापूर हे उर्दू भाषेचे केंद्र होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध शायर बशर नवाज यांनी केले.

सोलापूरचे ज्येष्ठ शायर बशीर दौलताबाद ‘परवाज’ यांनी लिहिलेल्या ‘खयाल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी सायांक ाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक हसन कमाल, नावेद सिद्दिकी, बशीर परवाज, युनूस गदवाल आदी होते. प्रारंभी नाएला बिजापुरे या मुलीने कुरआन पठण केले. तसेच अमृता पत्की यांनी हम्द (ईशस्तवन) सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

नवाज म्हणाले, सध्या उर्दूची प्रसिद्धी खर्‍या अर्थाने होत आहे. प्रत्येक ठिकाणी बज्मे गालिबसारख्या संस्थांनी ग्रंथालय सुरू करावीत. यातूनच पुढची पिढी तयार होईल. ‘खयाल’ काव्यसंग्रहात बशीर परवाज यांनी उत्तम काव्ये सादर केली आहेत. तरुण कवींनी त्यांचा आदर्श घेत काव्य लिहावे.

यावेळी प्राचार्य डॉ. गुलामअहमद दस्तगीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, शफी इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.