आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोर्‍यापोटी सोलापूरच्या महापौरांनी भरले 4480 रुपये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापौर अलका राठोड यांच्या होटगी रोडवरील जवाहर नगर येथील घराचे नूतनीकरण सुरू आहे. स्लॅबचे पाडकाम करण्यात येत आहे. आजोर्‍यापोटी 4480 रुपये मनपास भरले आहेत.

तेथील आजोरा महापालिकेच्या वाहनातून उचलण्यात आला, त्यासाठी महापौरांचे पती दगडू राठोड यांच्या नावाने चार हजार रुपये आजोर्‍यासाठी आणि 480 रुपये इतर करापोटी असे 4480 रुपये महापालिका झोन क्रमांक पाच येथे भरून रीतसर पावती केली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही बदल करणार असल्याचे महापौर अलका राठोड यांनी सांगितले.

प्राथमिक जबाबदारी मालकांचीच असते
इमारतीचा आजोरा उचलण्याची प्राथमिक जबाबदारी ही जागा मालकांचीच असते. त्यांनी न उचलल्यास महापालिकेच्या वतीने आकारणी करून तो आजोरा उचलला जातो.
-गंगाधर दुलंगे, प्रभारी नगर अभियंता