आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Microfinance Company Manager In Police Custody

मायक्रोफायनान्सच्या मॅनेजरला पाच दिवसांची पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अधिक दराच्या व्याजाचे आमिष दाखवून मायक्रो फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. कुरणे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. साखर पेठ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पिग्मीची जमा रक्कम परत देता उडवाउडवीची उत्तरे िदली, त्यामुळे हा प्रकार समोर आला. चौकशीत ओडिशातील कंपनीचे व्यवहार सीबीआयने थांबवल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती.


फुलारे यांच्यासह दोनशे जणांची एकत्रित फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोंदवून घेतली. ६७ लाख ५८ हजार १९० रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. न्यायालयात सरकारकडून अॅड. नाईकवाडी तर फिर्यादींकडून अॅड. प्रशांत नवगिरे, श्रीनिवास कटकूर अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.


इतरांना दिवसांची कोठडी
आरोपीफायनान्स मॅनेजर प्रिलोचन एपल्ली (रा. ओडिशा), कार्यालयीन कर्मचारी सत्यनारायण दासरी, संतोष जिल्ला, राजू गड्डम (रा. सोलापूर) यांना न्यायालयात उभे केले असता मुख्य आरोपी एपल्ली यास पाच दिवसांची तर अन्य जणांना दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.