आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-मिरज पॅसेंजरचा नवा प्रस्ताव, सध्याच्या गाडीचे भवितव्य मंत्रालयाच्या हाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोल्हापूर एक्स्प्रेससाठी पुरेसे प्रवाशी नसल्याने ती आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूरहून कोल्हापूरला सकाळी रेल्वे सोडावी, ही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरज पॅसेंजरचा प्रस्ताव तयार केला आहे. तो गुरुवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात पाठवला जाणार आहे.
या नव्या सोलापूर- मिरज पॅसेंजरसाठी मिरज- कुडरुवाडी पॅसेंजरचा रेक वापरण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. येत्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून हा प्रस्ताव पाठविला जात आहे. सध्या सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस यापूर्वी सकाळी सोडली जात होती. सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभेल, या आशेने या गाडीची वेळ रोज रात्री 11.30 वाजता अशी केली. रेल्वे मात्र सोलापूरहुन थेट कोल्हापूरकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या तोकडी असल्याने रेल्वेस मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सकाळची मागणी विचारत घेऊन नवीन पॅसेंजर गाडीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडीच्या वेळेत बदल केला आहे. ही गाडी दोन पॅसेंजरच्या लिंकमध्ये चालणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर पॅसेंजर गाडी सुरू होईल. आर्थिक संकटातील रात्रीच्या कोल्हापूर गाडीचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जाईल.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक