आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार माने यांना मारहाणीचा सोलापूरमधून निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार दिलीप माने यांना रविवारी सकाळी नवीपेठेत पार्किंगमध्ये चारचाकी गाडी लावण्यावरून मग्रुमखाने परिवाराकडून मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून उत्तर सोलापूर तालुका मागासवर्गीय पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

माजी पंचायत समितीचे सभापती संभाजी भडकुंबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. पृथ्वीराज माने चारचाकी गाडी लावताना मग्रुमखाने यांनी शिवीगाळ केली. आमदार माने यांनी ही घटना पाहण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा गैरफायदा घेऊन काहीजण संघटनेचे बॅनर वापरून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना रुक्मिणी केंगार, लता जावीर, पांडुरंग चवरे, सरपंच गुरूदेव गायकवाड, नागनाथ रणशूर, भीमराव वाघमारे, विष्णू वाघमारे, शिवाजी सोनावणे, पांडुरंग बेलभंडारे, जयसिंग गायकवाड, शंकर वाघमारे, प्रमोद गायकवाड, कोंडीबा वाघमारे, प्रभाकर टोणपे, चंद्रकांत मसलखांब, कैलास लोंढे, दगडू लांडगे, नागनाथ कापुरे, अनिल बोराडे, गोकुळ कसबे, दिलीप मस्के, सीताराम साबळे आदी उपस्थित होते.