आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच रस्त्याला दिली दोन जणांची नावे, मेजर वि. द. किरपेकर, शहीद मोहसीन शेख यांच्या नावाचे फलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रस्त्यांच्यानामकरणासाठी मनपा नामाविधान समिती अशी स्वतंत्र समिती असतानाही एकाच रस्त्याला दोन नावे देण्याचे प्रकार घडत आहेत. सात रस्ता ते गांधीनगर रस्त्यास मेजर वि. द. किरपेकर शहीद मोहसीन शेख यांचे नाव देण्यात आले. याप्रकरणी डॉ. विकास किरपेकर यांनी महापालिकेस पत्र लिहिले आहे. आयुक्तांनी हे पत्र सभागृहाकडे निर्णयासाठी पाठवले आहे.
सात रस्ता ते गांधीनगर या रस्त्यास मेजर वि. द. किरपेकर असे नाव देण्याचा ठराव सभेत 10 मे 1990 रोजी झाला. त्यानंतर 31 मे 2011 रोजी झालेल्या रेल्वे स्टेशन, सात रस्ता ते गांधी नगर या मार्गास शहीद मोहसीन शेख असे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. याबाबत डॉ. विकास किरपेकर यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून याबाबत कल्पना दिली. शहीद मोहसीन शेख यांच्या नावास डॉ. किरपेकर यांचा विरोध नसून एकाच रस्त्याला दोन नावे कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सभेचा निर्णय
एकाचरस्त्यास दोन नाव देण्याचा विषय महापालिका सभेत झाल्याने डॉ. किरपेकर यांचे पत्र सभागृहाकडे पाठवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतला.