आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजसाठी खोदलेल्या मातीचा ढासळला ढिगारा, मजूर ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शुक्रवार पेठेतील मोमीन गल्ली येथे महापालिकेचे ड्रेनेजलाइनचे खोदकाम करताना माती ढासळल्याने त्यात तिघे गाढले गेले. त्यापैकी दोघांचे प्राण वाचवण्यात तेथील नागरिकांना यश आले तर एक मजूर गुदमरून मरण पावला.
सुरक्षा साहित्याअभावी बुधवार पेठेत ड्रेनेज लाइनमध्ये एक कर्मचारी गुदमरून मृत झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी ही दुर्घटना घडली. मलकारी ओगसिद्ध व्हनमाने (वय ३०, रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत मजुराचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमाराला घडला. कामाच्या ठिकाणी मनपाचे कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने महापौर सुशीला आबुटे यांनी संताप व्यक्त केला.
आठजणहोते कामावर
दक्षिणसोलापूर तालुक्यातील मद्रे येथील आठ मजूर ड्रेनेज लाइन खोदकामासाठी आले होते. त्यापैकी चौघे लाइनमध्ये काम करत होते. रस्त्यावर माती टाकू नका असा नागरिकांचा आग्रह होता. दरम्यान, माती टाकताना हा अपघात झाला. यात बाशा अब्बास तांबाेळी, आंेकार मल्लिकार्जुन सुतार, मलकारी व्हनमाने, सोमलिंग दादाराव व्हनमाने आदी काम करत होते. माती ओलसर असल्याने खालचा भाग ढासळला आणि वरील माती अंगावर पडल्याने मलकारी जागीच गुदमरून मरण पावला. त्यांच्या मागे पत्नी, दाेन मुली, मुलगा असा परिवार आहे.
१. ढिगाऱ्याखाली बाशा तांबोळी, ओंकार सुतार, चंद्रकांत व्हनमाने आणि मलकारी हे चौघे अडकले. त्यातील तिघांना तेथील नागरिकांनी संघर्ष करून अर्ध्या तासात काढले.
२. मनपा कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, पोलिस अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी सुमारे एक तास संघर्ष केला. मृतदेहास कोणतीही इजा होता बाहेर काढले.
३. माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, आनंद चंदनशिवे, मनपा अधिकारी उपस्थित होते. नंतर महापौर आबुटे, बाबा मिस्त्री हेही पोहोचले.

हेल्मेट असते तर...
खासगीमक्तेदार असला तरी हेल्मेट, बूट आदी साहित्य देण्यात आले नव्हते. घटनेच्या वेळी त्यांच्याकडे हेल्मेट नसल्याने मलकारी यांना बचाव करता आला नाही. सुमारे अर्धा किलोमीटर ड्रेनेज लाइन घालण्याचे ४.७७ लाखांचे काम अजिंक्य बिल्डर्स यांना देण्यात आले होते. त्यांनी एका खासगी मक्तेदाराला काम दिले. कामाच्या ठिकाणी रविशंकर आणि उपअभियंता यू. बी. माशाळे उपस्थित नव्हते. ही बाब महापौर आबुटे यांना समजताच त्या संतापल्या. गुडेवार गेले असे समजू नका, आता मलाच गुडेवार व्हावे लागेल.