आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिरा आली जाग: पालिकेने "वालचंद'कडे भरले लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुळे सोलापुरात करण्यात आलेल्या रस्ते चौकशी प्रकरणात नवे ट्विस्ट निर्माण झाले आहे. रस्त्यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या थर्ड पार्टीला महापालिकेकडून फी दिली नसल्याने आजपर्यंत अहवाल रखडला होता.
उशिरा जाग आलेल्या महापालिकेने ठरलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम संबंधित संस्थेकडे जमा केली. निम्मी रक्कम मिळाल्याने येत्या आठवडाभरात हा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री निधीतून जुळे सोलापूर परिसरात ६५ रस्ते करण्यात आले होते. यामध्ये अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला आहे, या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी गेडाम यांच्या पथकांकडून चौकशी करण्यात आली.
साडे चार महिने लोटले...
जिल्हाधिकारीयांनी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर रस्ते चौकशी करण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर २०१४ संपला तरी अहवाल आल्याने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी १५ जानेवारीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने समितीने अहवाल दिला नाही.
स्थायी समितीसमोर विषय-
जुळेसोलापुरातील रस्ते चौकशीसाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टीला फी देण्याचा विषय स्थायी समितीसमोर आला आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत हा विषय मंजूर होईल, त्यानंतर उर्वरित रक्क्मही संबंधित संस्थेला दिली जाणार आहे.
आठवडाभरात अहवाल
रस्तेचौकशीचे थर्ड पार्टी म्हणून वालचंद अभियांत्रिकीकडे काम दिले होते. ते कामही पूर्ण झाले आहे. चौकशी अधिकारी यांच्याकडून अभिप्राय येणे बाकी आहे. फी मिळाल्याने अहवाल रखडला असे नाही, करार करताना काही नियम अटी असतात, त्या पालन केल्या नाहीत इतकेच. आठवडाभरात हा अहवाल मनपा आयुक्तांना सादर करू. प्राचार्यशशिकांत हलकुडे, वालचंद अभियांत्रिकी महािवद्यालय