आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation 104 Corore Fund Contro

पालिकेच्या अनास्थेमुळे विकासकामांसाठीचे 104 कोटी पडून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे राज्य सरकारने दिलेले 104 कोटी रुपये विकासकामांवर खर्च न होताच तसेच विविध बँकांमध्ये पडून आहेत. सिग्नल बंद, उखडलेले रस्ते, पाणीपुरवठय़ात अनेक त्रुटी आदी अडचणी दूर करण्यासाठी निधी नसल्याचे महापालिका एकीकडे सांगते तर दुसरीकडे असा निधी पडून आहे.

सन 2011-12 आणि 2012-13 मध्ये शासनाकडून विविध योजनेखाली 273 कोटी 38 लाख 43 हजार 570 रुपये महापालिकेस प्राप्त झाले. त्यापैकी केवळ 168 कोटी 49 लाख 67 हजार 717 रुपये खर्च केले गेले. अन्य 104 कोटी 98 लाख 75 हजार 853 रुपये महापालिकेच्या तिजोरीत पडून असल्याची नोंद मुख्य लेखपाल कार्यालयातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या अक्षम्य अनास्थामुळे रक्कम असूनही नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. यूआयडीएसएसएमटी आणि राजीव आवास योजनेचे पैसे मार्च अखेरपर्यंत खर्च करा, असा आदेश शासनाकडून दिला तरीही महापालिका या विषयावर गप्पच आहे.

शासनाकडून विविध प्रकारच्या 25 योजनांसाठी महापालिकेला पैसे मिळाले. ही रक्कम खर्च झालेली नसताना महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी पुन्हा 16 कोटी रुपयांची मागणी केली. त्याउलट आमदार प्रणिती शिंदे यांनी अनुदानाचे पैसे महापालिका खर्च करत नाही, असे जाहीर सांगत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेला मिळालेल्या अनुदानाचा आणि विकासकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

नशिब ‘मार्च एन्ड’चा नियम लागू नाही!
शासनाकडून विविध ‘हेडखाली’ आलेल्या या निधीला ‘मार्च एन्ड’ लागू नाही, अन्यथा या 104 कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले असते. अन्यथा मार्चअखेर या रकमा खर्च न झाल्याने ‘लॅप्स’ (परत गेल्या असत्या) झाल्या असत्या. पण सुदैव एवढेच की मार्चनंतरही या निधीतील कामे पूर्ण करता येऊ शकतात.

‘मुख्य लेखपाल’ने दिली लेखी माहिती
महापालिकेकडे विविध अनुदानातून आलेल्या रकमांपैकी 104 कोटी रुपये शिल्लक आहेत, अशी लेखी माहिती मुख्य लेखपाल कार्यालयाकडूनच देण्यात आली आहे. या संबंधात नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयामार्फत कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशा आहेत शिल्लक रकमा

अनुदान प्रकार शिल्लक

मुद्रांक शुल्क अधिभार एक टक्के 2.66 कोटी
रस्ता अनुदान 5.93 कोटी
अल्पसंख्याक बहुलक्षेत्र विकास 2.98 लाख
नागरी दलित वस्ती सुधारणा 77.29 लाख
दलित वस्ती सुधारणा पाणीपुरवठा 16.08 लाख
नवबौध्द घरकुल योजना 4.06 कोटी
नगरोत्थान योजना (ड्रेनेज) 17.72 कोटी
नगरोत्थान योजना (रस्ते) 22.14 कोटी
यूएसएसआयडीएमएमटी 23.51 कोटी
डॉ. आंबेडकर श्रमसाफल्य योजना 1.68 कोटी
13 वे वित्त आयोग अनुदान 2.12 कोटी
पथदिव्यात पथदर्शी प्रकल्प राबवणे 20 लाख
घर तेथे शौचालय योजना 8.08 कोटी
यूआयडी 35 लाख
केंद्रीय चिडिया घर प्राधिकरण 1.20 कोटी
राजीव आवास योजना 57.34 लाख
आयएचएसडीपी 3.30 कोटी
अल्ली महाराज सांस्कृतिक भवन 21.78 लाख
पाण्यासाठी विशेष अनुदान 3.22 कोटी
12 वे वित्त आयोगातून विकास कामे 2.06 कोटी
12 व्या वित्त आयोगातून घनकचरा 4.95 कोटी