आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा अधिकार्‍यास मारहाण प्रकरण; नगरसेविका फुलारेंसह चौघांना पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या अधिकार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविका र्शीदेवी फुलारे, पती जॉन फुलारे यांच्यासह चौघांना शुक्रवारी न्यायदंडाधिकारी पी. पी. जाधव यांनी चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

समीक्षा कन्स्ट्रक्शनचे किशोर गीते यांना एक दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. महापालिकेचे विभागीय अधिकारी रवींद्र वडावराव यांना चार फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी मंजूर केला आहे.

नगरसेविका फुलारी, पती जॉन फुलारी, सदानंद विलास शिंदे, जीवन शिंदे (रा. कोनापुरे चाळ) यांना चार दिवस तर किशोर गीते यांना एक दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. कचरा उचलण्याच्या कारणावरून नगरसेविका फुलारे व त्यांचे पती व कार्यकर्त्यांनी मिळून गीते व वडावराव यांना मारहाण केली होती. वडावराव व गीते यांच्याविरोधातही सौ. फुलारे यांनी फिर्याद दिली आहे. सदर बझार पोलिसात या घटनेची नोंद आहे.