आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Civic Body President Election Issue

अखेर महानाट्यावर पडला पडदा; इब्राहिम कुरेशी बिनविरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या खलबतांना बुधवारी विराम मिळाला. कथित प्रतिस्पर्धी असलेल्या पद्माकर काळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीपूर्वीच बाद झाल्याने इब्राहिम कुरेशी हे सभापतीपदी बिनविरोध निवडून आले. पालिकेची तिजोरी अशी ओळख असणार्‍या स्थायी समिती सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक होती. मंगळवारी तळ्यात मळ्यात करणार्‍या काळे यांचा अर्ज छाननीपूर्वीच बाद झाला. कारण, कुरेशी यांच्या अर्जावर काळे यांची सूचक म्हणून सही होती.

सभागृहात कुरेशी यांचे नाव जाहीर होताच पालिकेच्या इमारतीसमोरील हिरवळीवर कुरेशी सर्मथकांनी ढोलताशे वाजवत आणि गुलालाची उधळण केली. उन्हामुळे वाळलेली हिरवळ काही अंशी तरी हिरवी झाली.

खेळी दोन ‘महेशां’ची
निवडणुकीचे कामकाज सभागृहात चालू होते. तेव्हा विद्यमान सभापती कोंड्याल यांच्या अँटीचेंबरमध्ये राष्ट्रवादीचे महेश गादेकर आणि काँग्रेसचे महेश कोठे यांच्यात गुप्त खलबते सुरू होती. अरिफ शेख, शिवलिंग कांबळे, दिलीप कोल्हे, दीपक राजगे तेथे दाखल झाले. परंतु तोपर्यंत या दोघांची बोलणी संपली होती.

‘कलमा’मुळे स्वप्न भंगले
महानगरपालिकेच्या विविध निवडणुका आणि नेमणुका यांच्यासाठी कलमावली पुस्तक आहे. स्थायी समिती निवडणूक कलम क्रमांक 3 (3) नुसार नगरसेवक पद्माकर काळे यांचा अर्ज बाद झाला. या नियमाचा अर्थ असा आहे की, जो उमेदवार निवडणुकीस उभारला आहे, त्याला दुसर्‍या उमेदवाराच्या अर्जावर सूचक किंवा अनुमोदक म्हणून सही करता येत नसते.

..आणि डॉ. गेडाम कडाडले
निवडणुकीचे कामकाज सुरू होते. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळे हेच आहेत याचा पुरावा आहे का? असा सवाल केला. तेव्हा गेडामांनी आवाजाचा पारा चढवला. पाटील आपण शांत बसा, हे कामकाज पहायला मी येथे बसलो आहे असे सुनावले.