आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Doubtfully Purchased Banch

सोलापूर महापालिकेतील बाकडे खरेदी संशयास्पद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यापूर्वी महापालिकेत बाकडे घोटाळा झाला असताना पुन्हा बाकड्यांची खिरापत वाटण्याचा प्रकार महापालिकेत सुरू आहे. काही नगरसेवकही त्यात रस घेत आहेत. बाकड्यांचा सावळा-गोंधळ सुरू असताना नगरसेवक आरिफ शेख यांनी चार लाख रुपयांच्या बाकड्यांची खरेदी रद्द केली आहे. बाकड्याचे दर 1375 रुपये ठरले असताना 2500 रुपये दर आकारणी झाली आणि वर्क ऑर्डरनंतर दोन महिन्यांत बाकड्यांचा पुरवठा करणे आवश्यक असताना तसे केले नाही. मक्तेदारांच्या सोयीनुसार दर आणि पुरवठा होत असून महापालिका प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.

शहरातील अनेक रस्ते चिखल आणि दलदल यात हरवून गेले आहेत. रस्त्यात खड्डे असणे जणू नियमच बनले आहे. पाणीपुरवठय़ात व्यत्यय येतो, रात्री अंधार आहे. रस्ते, वीज यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने निधी देणे आवश्यक असताना काही नगरसेवकांच्या मनात बाकड्यांविषयी प्रेम वाटत आहे. नगरसेवक उदयशंकर चाकोते यांनी बाकड्याबाबत तक्रार करणार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. त्यांनी अद्याप तक्रार दिली नाही. याबाबत त्यांना विचारले असता, तक्रार देतो असे सांगितले.