आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Economic Conditions Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधीचा खडखडाट: कर संकलनाला थंडा प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एलबीटी वसुली करा, होत नसेल तर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, थकीत बिले वसूल करा, अनधिकृत नळ शोध मोहीम घ्या, बीओटीच्या योजना मार्गी लावा, मंडई विभागाचे विभागनिहाय खासगीकरण करून तेथील उत्पन्न वाढवा यासाठी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना सूचना केली. त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढेल.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता त्यातून बाहेर येण्यासाठी आणि मनपाचे उत्पन्न वाढीसाठी महापौर सुशीला आबुटे यांनी मनपा पदाधिकारी अधिकारी यांची बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात घेतली. तीन तास बैठक चालली.

एलबीटीची थकबाकी वसुलीसाठी अधिकार वापरून कारवाई करावी, बांधकाम परवाना रखडल्याने ते त्वरित द्यावे, वापर परवाना दिल्यास करात वाढ होईल. मंड्या विभागाचे खासगीकरण करणे आदी सूचना करण्यात आले. प्रत्येक विभागनिहाय आढावा घेऊन उत्पन्न वाढवण्याबाबत सूचना पदाधिकऱ्यांनी केली. जून अखेर पर्यंत निर्णय घ्यावा. पुन्हा बैठक घेऊ असे मनपा सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निर्णय घेतल्यास भरेल महापालिकेची तिजोरी
महापालिकेच्या तिजोरीत कर रूपाने संकलित होणाऱ्या निधीत दिवसेंदिवस तूटच येत आहे. शासनाने एलबीटीसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली असली तरी त्यालाही तितकासा प्रतिसाद मिळत नाही. मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन महिना उशिराने होत आहे. निधीअभावी भांडवली विकास कामांवर विपरित परिणाम झाला आहे. नगरोत्थानच्या कामाची गती मंदावली आहे. किमानअंशी मनपा अधिकारी पदाधिकाऱ्यांनी वेळेत युजरचार्जेस, गाळे भाडेवाढ, एनए, बांधकाम मान्यता असे विषय मार्गी लावले तरच आर्थिक गाडा चालू शकेल.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या आर्थिकस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेवर ४०७ कोटींचे कर्ज आहे. मनपा तिजोरीत रक्कमा नसल्याने भांडवली कामे अद्याप सुरू झाली नाहीत. नगरोत्थान योजनेच्या कामाचा वेग कमालीने कमी झाला आहे. असे असताना मनपाच्या तिजोरीत भर घालणारे अनेक निर्णय प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय झाल्यास महिन्यात १०० कोटी रुपये जमा होतील. निर्णय होत नसल्याने उत्पन्नाला ब्रेक लागला आहे.

गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित : शहरातीलमनपाच्या मेजर मिनी गाळ्यांचा भाडेवाढ करण्याचा विषय शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यावर निर्णय घेत नाही. शासनपातळीवर आवश्यक त्या वेगाने प्रयत्न केले जात नाही. तिजोरीवर २१ कोटींचा फटका बसत आहे.
युजर चार्ज : युजनाही तर युजर चार्ज कशाला? म्हणून युजर चार्ज वसुल करू नये, असा प्रस्ताव मनपा सभागृहात चारवेळा झाला. थकबाकी म्हणून चालू बिलात दुप्पट दंडासह युजर चार्ज लावला आहे. युजर चार्ज दंडासह आकारणी केल्याने मिळकत कर भरण्यास नागरिक उत्सुक नाहीत. त्यामुळे तूर्त १० कोटींची वसुली वेळेत झालेली नाही.
बांधकाम परवानगी पंधरवड्यात : प्रभारीनगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेतली. बांधकाम परवानगी रखडल्याने मनपा तिजोरीत विकास शुल्कापोटी जमा होणारी रक्कम थांबली.
विकास शुल्क : एनए ५०० एकर जागेवरील एनए प्रकरणे महापालिका नगर नगर रचना विभागात पडून आहेत. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. विकास शुल्कापोटीच्या ५० कोटीस ब्रेक बसला आहे.
एलबीटी : एलबीटी बंद होणार असल्याने व्यापारी एलबीटी भरत नाहीत. थकीत रक्कम वसूल करण्यास त्या विभागास अपयश आले आहे. अभय योजनेवर मनपा अवंलबून आहे. एलबीटीचा ३० कोटींचा फटका मनपास बसला. त्यापोटी मनपा शासनाकडे अनुदानाची मागणी करत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आयुक्तांनी केली विनंती...६०० कोटी उत्पन्न मिळेल...