आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Employee Payment Issue

कर वसुली कमी; कर्मचार्‍यांच्या पगारात कपात, सोलापूर महापालिका आयुक्तांचा आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कर वसुली ठरल्यापेक्षा 30 टक्के कमी झाली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांच्या फेब्रुवारीच्या वेतनात 25 टक्के कपात करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी दिला आहे. महापालिकेकडे वेतन करण्यासाठी आता पुरेशी रक्कम नसल्याने तीन दिवस वेतन लांबण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर 75 टक्के वसुली अपेक्षित होती. पण, कमी वसुली झाल्याने पालिकेच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 30 टक्यापेक्षा कमी वसुली आणलेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय आयुक्त सावरीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार अशा कर्मचार्‍यांच्या वेतन कपातीचा आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. विशेष करून स्थानिक संस्था कर (एलबीटी), कर आकारणी, कर आकारणी हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई विभागांना दिले. 25 टक्के वेतन कपात तूर्त असून, वसुली झाल्यास ते वेतन अदा करण्यासंदर्भात पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असे र्शी. सावरीकर यांनी स्पष्ट केले आहे.

जकात बंद झाल्यानंतर ‘एलबीटी’, पाणीपट्टी, यूजर चार्जेस यांची वसुली होत नसल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. शहरात विकास कामे होत नसल्याने नागरिकांची ओरड कायम आहे. त्यामुळे नगरसेवकांचे कामासाठी आग्रह आहे. मात्र, तिजोरीतच खणखणाट असल्याने विकासकामे करणे अवघड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहेत. कर्मचार्‍यांचे वेतन देणेही अवघड होत आहे. मध्यंतरी निधीसाठी राज्य सरकारकडे मागावे लागले होते. त्यामुळे एलबीटी आदी करांच्या पूर्ण वसुलीसाठी आयुक्त सावरीकर यांनी कडक पावले उचलली.