आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Faces Lack Of Cash

सोलापूर पालिकेला भासतेय पैशाची चणचण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेला 386 कोटी रुपयांची देणी असून, तिची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. स्थानिक संस्था करातून (एलबीटी) अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने पैशाची चणचण निर्माण झाली आहे. पर्यायी मार्गाचा शोध घेण्यात येत आहे.

त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला कर्मचार्‍यांना वेतन अदा करणे अपेक्षित असताना जून महिन्यात 26 तारीख उजाडावी लागली. महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सभागृहासमोर यावी, यासाठी सविस्तर माहिती पाठवणार असल्याचे आयुक्त अजय सावरीकर यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर जुलै महिन्याच्या सभेत चर्चा होईल. जुलै महिन्यातील पगार कसा करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वसुलीला गती
एलबीटी वसुलीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. एका पथकात तीन जणांचा समावेश आहे. या वसुली अभियानामुळे उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. व्यापार्‍यांकडे जाऊन एलबीटी भरण्यासाठी आग्रह धरला जात आहे.

जुलैचे वेतन उशिरा
जून महिन्यात पगार उशिरा झाला. जुलै महिन्यातही उशिराने होण्याची शक्यता आहे. 13 व्या वित्त आयोगाच्या रकमा वेतनासाठी वापरण्यास शासनाने यापूर्वीच परवानगी नाकारली. त्यामुळे त्या रकमा वापरता येणार नाहीत. अजय सावरीकर, आयुक्त मनपा