आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविकेच्या पतीला मक्ता; नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नगरसेविका कुमुद अंकाराम यांच्या पतीलाच महापालिकेच्या कामाचा मक्ता मिळाल्यामुळे अंकाराम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी स्थायी समितीत केली.

सात रस्ता परिसरातील नाना-नानी पार्कच्या नूतनीकरणाच्या कामाचा मक्ता नगरसेविका कुमुद यांचे पती भिमाशंकर अंकाराम यांना देण्यात आला आहे. मुंबई प्रांतिक महाअधिनियम 1949 चे कलम 20 पोटकलम 1 (अ दोन) नुसार नगरसेवकाच्या पतीस मक्ता घेता येत नाही. गुरुवारी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बागेच्या नूतनीकरणाचा विषय बहुमताने झाला.

3.45 कोटी प्रस्ताव तूर्त तहकूब : प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी पिंजरा, बाग, फूटपाथ, शौचालय आदी कामे करण्यासाठी मास्टर प्लॅन अंतर्गत 3.45 कोटींच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समोर आला असता, तो विषय तूर्त तहकूब केला.

स्थायीतील अन्य विषय
>24.5 लाखांचे हातपंप बसवण्याचे काम
>एमआयडीसी पंप हाऊस येथे पंप बसवणे
>अंत्रोळीकर शॉपिंग सेंटरचे 1500 स्वे.फूट टेरेस जागा शामल कोळी यांना देणे
>रूपाभवानी मंदिरजवळील मंगल कार्यालय 29 वर्षांच्या कराराने भाड्याने देणे