आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: स्थायीत प्रस्ताव, आता जन्म-मृत्यू दाखलेही महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जन्म-मृत्यू दाखला, अंत्यसंस्कार करणे, पोहणे, सेप्टीटँक साफ करणे, विविध प्रकारचे परवाना शुल्क, शववाहिका, रुग्णवाहिका, एक्स-रे काढणे, बाह्यरूग्ण उपचार महाग होणार आहेत. मात्र, भाजी मार्केटमधील असलेल्या कट्टय़ाचे दर मात्र कमी होणार आहेत. मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीपुढे हे सर्व विषय असून, त्यावर निर्णय होणार आहेत.

भाववाढीस मान्यता मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात एक कोटीने वाढ होईल असा अंदाज आहे. डिझेल आणि सुट्या भागांच्या किमती महागल्याने सेप्टीटँक साफ करणे, शववाहिका आणि रुग्णवाहिकेचे दर महागणार आहेत. जलतरण तलावातील दुरुस्ती महागली असून, जलतरण पाससाठी दहा वर्षापासून फी वाढ केली नाही. म्हणून ती आता वाढणार आहे. वीज बिल जास्त असल्याने मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार आकारणी वाढणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या 119 प्रकारच्या परवाना शुल्कात 25 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव परवाना विभागाकडून स्थायीकडे आला आहे.

प्रकार पूर्वीचे दर वाढीव प्रस्तावित दर
शववाहिका/रुग्णवाहिका (शहरात) 50 100
शववाहिका/रुग्णवाहिका (शहराबाहेर) 4 प्रति किमी 8 प्रति किमी
सेप्टीटँक साफ करणे 400 800
सेप्टीटँक साफ करणे (शहराबाहेर) 400 (प्रति किमी 4) 800 (प्रति किमी 8)
8 बाय 10 इंची एक्स-रे 65 80
10 बाय 12 इंची एक्सरे 70 100
12 बाय 15 इंची एक्सरे 80 125
ओपीडी तपासणी 5 10

दाखला फी- (पूर्वी नवीन)
जन्म-मृत्यू 30- 50
असेसमेंट 55- 80
रिव्हिजन 110- 130
प्रोसिडिंग 55- 80
डिमांड 55- 80
लायसन 60- 90
बांधकाम परवाना 125- 150
(फॉर्म फी )
ठराव 60- 90
जन्म-मृत्यू शोधणावळ फी 1- 10
विद्यार्थी मासिक पास 100- 200
सर्वसाधारण 225- 450
विद्यार्थी वार्षिक 500- 1000
कौटुंबिक (पाच व्यक्तीसाठी) 2000- 4000
पंचवार्षिक 3500- 7000
दशवार्षिक 7000- 14000
विद्युत दाहिनी अंत्यसंस्कार 300- 500