आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांवर दबावाच्या राजकारणास सुरुवात; सावस्करांना टार्गेट करू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका प्रशासनाच्या शिस्तीच्या कारभारास आडकाठी आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचे सोमवारी दिसून आले. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत नगरअभियंता सुभाष सावस्कर यांना ‘टार्गेट’ करू नका. अतिक्रमणविरोधी कारवाईची कल्पना देण्यासाठी रिक्षाने दवंडी फिरवा. तसेच, धनदांडग्यांच्या इमारती पाडा, अशा सूचना करण्यात आल्या. आश्चर्य म्हणजे अतिक्रमणापेक्षा इतर विषयांकडे लक्ष देण्याचीही सूचना करण्यात आली.

परिवहनचा आराखडा तयार
परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी केंद्राच्या योजनेअंतर्गत 110 सिटीबस व अत्याधुनिक डेपोसाठी विकास आराखडा तयार आहे. त्यावर सोमवारी गुडेवार यांनी सही केली.

बैठकीस उपस्थिती
महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, आमदार दिलीप माने, सभागृह नेता महेश कोठे, स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, राष्ट्रवादी पालिका गटनेता दिलीप कोल्हे, विरोधी पक्षनेता कृष्णहरी दुस्सा, परिवहन समिती सभापती सुभाष चव्हाण, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी उपस्थित होते.

सावस्करांसाठी दबावतंत्र
अधिकारपदाचा गैरफायदा घेत सावस्कर यांनी घर बांधल्याचा आरोप आहे. ‘सावस्करांना ‘टार्गेट’ करू नका’, असे सांगण्यामागे आयुक्त चंद्रकांत गुडेवार जाणीवपूर्वक सावस्करांना लक्ष्य करत असल्याचा अर्थ ध्वनीत होतो. त्यांच्यावरील कारवाईने लोकप्रतिनिधी व्यथित दिसतात. प्रशासनाने नियमाप्रमाणे खुलाशासाठी नोटीस बजावली. तरीही त्यांची बाजू ऐकून घ्या, असे लोकप्रतिनिधी म्हणाले.

कारवाई नियमानुसार
नगर अभियंता सावस्कर यांच्यावर कारवाई नियमानुसार करण्यात येत आहे. अतिक्रमणविषयी काही योग्य सूचना होत्या. परिवहनचा आराखडा मंगळवारी राज्य सरकारकडे जाईल.
- चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त

सावस्करांचे म्हणणे ऐकून घ्या
एका मागासवर्गीय अधिकार्‍यांना टार्गेट करू नये. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असे मत माझे आहे. त्यांच्यावर कारवाई करत असताना इतर अधिकार्‍यांच्या घरांची फाइल मागवा.
-दिलीप माने, आमदार

कारवाईआधी चर्चा करावी
सर्वसामान्याचे हित पाहिले पाहिजे. कारवाईच्या आधी आमच्याशी चर्चा करावी. सावस्करांना टार्गेट करू नका. अतिक्रमणाशिवाय इतर विषयांकडे आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे.
-अलका राठोड, महापौर

मोहिमेस खीळ घालण्याचा प्रयत्न
वर्षांनुवर्षे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने पोसलेली आणि वाढलेली अवैध बांधकामे, विनापरवाना बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्याची धाडसी कारवाई गुडेवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाने सुरू केली. सामान्य लोकांमधून त्याचे स्वागतच होत आहे. ‘अतिक्रमणविरोधी कारवाईत धनदांडग्यांच्या इमारती पाडा’, असे सांगण्यातून महापालिका प्रशासन र्शीमंतांच्या इमारती पाडत नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवताना नागरिकांना किमान आठ दिवस आधी नोटीस द्या. उद्या मोहीम असेल तर त्या परिसरात एक दिवस अगोदर दवंडी द्या. त्यामुळे होणारे नुकसान टळणार आहे. सर्वसामान्यांच्या इमारती पाडत असताना शहरात धनदांडग्यांच्या बेकायदा इमारतींवरही कारवाई करा, अशा सूचना देण्यात आल्या.