आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेतही गोंधळ, प्रश्न अनुत्तरितच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबईत विधानसभेत देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजुरीवेळी जसा गोंधळ झाला, तशीच काहीसी गोंधळाची स्थिती सोलापूर महापालिकेतही अनुभवास आली. डेंग्यू, कचरा असे जिव्हाळ्याचे विषय सभागृहाच्या पटलावर असतानाही केवळ राजकीय भाषणे आणि आरोप-प्रत्यारोपांवरच नगरसेवकांनी धन्यता मानली. या गोंधळात एलबीटी रद्द वगळता मुख्य मुद्द्यांवर गांभीर्याने ना उत्तरे शोधली ना उपाययोजना झाली.

ऑगस्ट सप्टेंबरची तहकूब सभा बुधवारी महापौर सुशीला आबुटे यांनी बोलवली होती. सुरुवातीलाच नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी डेंग्यूवर लक्षवेधी करीत डेंग्यूचे रुग्ण किती त्यासंदर्भात काय कारवाई केली, अशी विचारणा केली. आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी दोन महिन्यांत डेंग्यू नियंत्रित असल्याचे उत्तर दिले. जगदीश पाटील यांनी डेंग्यूचे १५० रुग्ण असून सात जणांचा मृत्यू झाला आहे, असा सनसनाटी आरोप करून आरोग्य विभाग निष्क्रिय असल्याचे सांिगतले.

याविषयांना मिळाली मंजुरी
रूपाभवानीसमाजमंदिर पोलिस ठाण्यास देणे. बोरामणी नाका ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्ता दुभाजकावर पथदिवे बसवणे.

शहरात औषध चिठ्ठीमुक्त योजना.
मी अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचे सांगणारे शिवसेनेचे महेश कोठे मनपा सभागृहात भाजपच्या गराड्यात हास्यविनोद करताना.

पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा इशारा
एलबीटी रद्द करा, असा प्रस्ताव भाजपाने आणला होता. त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. यावर भाजपचे अशोक निंबर्गी, जगदीश पाटील आणि काँग्रेसचे अॅड. बेरिया यांच्यात राजकीय चर्चा रंगली. व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पाळा, असा चिमटा बेरियांनी काढला. आमदार प्रणिती शिंदे यांच्या एमआयएमबद्दलच्या भूमिकेला जगदीश पाटील यांनी समर्थन दिले.

आयुक्तांच्या कामांना मान्यता
आयुक्तांनीकेलेल्या अत्यावश्यक कामांच्या मंजुरीच्या विषयावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. उन्हाळ्यापर्यंत कामे पूर्ण करा, असे सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी सूचवले. अनिल पल्ली यांनी विषय मंजुरीनंतर बोलण्याचा केलेला प्रयत्न आनंद चंदनशिवे यांनी हाणून पाडला.

कोठे म्हणाले, मी काँग्रेसमध्ये, बसलो भाजपच्या गराड्यात
विधानसभानिवडणुकीत पराभूत झालेले महेश कोठे, मोहिनी पत्की आणि मनोज शेजवाल हे भाजप आणि शिवसेनेचे तीनही नगरसेवक बुधवारी सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले. शिवसेनेत गेलेले कोठे मी मनपात काँग्रेसमध्येच आहे असे म्हणत भाजपच्या गराड्यात बसले होते.

दररोज की दिवसाआड पाणी यावे, यावर चर्चा करण्यात नगरसेवकांनी धन्यता मानली. प्रशासनाने दोन दिवसांआड पाणी देऊ असे सांगितले. सध्या ३० ते ३५ एमएलडी पाणी वाढवून काही भागांत दोन दिवसांआड तर काही भागात दिवसाआड करू शकतो. टाकळीहून नवीन पाइपलाइनसाठी जलसंपदा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असल्याचे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले. पाण्यावर तोडगा निघाल्यास आम्ही महापालिकेत आंदोलन करू, असा इशारा सत्ताधारी अॅड. बेरिया यांनी दिला.