आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Maternity Home Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर मनपा प्रसूतीगृहे ओस, रुग्णालयांकडे वाढतोय महिलांचा ओढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरी सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे. सोलापुरात महापालिकेच्या आठ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृहाची सुविधा आहे. परंतु महिला रुग्णांची संख्या तोकडी आहे. प्रसूतीसाठी शहरातील महिलांचा लोंढा सिव्हिल प्रसूतीगृहाकडेच वाढतो आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ व तांत्रिक सुविधांचा अभाव असल्यामुळे मनपा रुग्णालयात महिला रुग्ण टाळाटाळ करतात. विशेषत: गंभीर प्रसंगी रुग्णांना तर दाखल करून घेण्याची सुविधा मनपा आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. सिव्हिलवर यामुळे ताण वाढत आहे. रुग्ण अधिक आणि कर्मचारी कमी या ताणामुळे येथे येणार्‍या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची येथील महिला कर्मचार्‍यांकडून अवहेलना होत आहे.

गरीब व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना आजही खासगी रुग्णालयातील प्रसूती खर्च परवडत नाही. महापालिकेची शहरात आठ प्रसूतीगृहे आहेत. परंतु शहरातील गर्भवती महिलांचा लोंढा जिल्हा रुग्णालयाकडे अधिक असल्याचे दिसून येतो. मनपाकडून रुग्णालयात मूलभूत सोयी सुविधा व तंत्रकुशलता, मनुष्यबळ पुरविले जात नसल्याची ओरड रुग्णांची आहे.

स्वच्छतागृहे नावालाच ?
मनपा प्रसूतीगृहात ठिकठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येतो. यासाठी रुग्णालय तसेच स्वच्छतागृहात स्वच्छता आवश्यक आहे. पण रुग्णालयांत याची काळजी घेतली जात नाही. मनपा प्रसूतीगृहातील अनेक स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत. गरम पाण्यासाठी गिझर बसवलेले आहेत पण काही ठिकाणी दुरुस्तीअभावी बंद आहेत. महिला रुग्णांना गरम पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील गैरसोय लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयांना प्राधान्य देतात.

कर्मचार्‍यांची मुजोरी
जिल्हा रुग्णालयातील काही महिला कर्मचारी रुग्णांना कसेही बोलतात.काही सुविधांची मागणी केल्यास इथे असेच आहे. ऐश करायची असेल तर खासगी दवाखान्यात जा, असे उत्तर देतात. वरिष्ठांकडे तक्रार करावी कशी? कोणत्याही स्वरूपाचे तक्र ार रजिस्टर शासकीय रुग्णालयात नाही. तक्रारपेटीही नाही. अभिप्राय नोंदवही नाही. त्यामुळे मुजोरी वाढतच आहे.

पाण्याची वानवा
महापालिकेच्या प्रसूतीगृहात किमान पिण्याच्या पाण्याची मोडक ी-तोडकी व्यवस्था असणे आवश्यक आहे.परंतु महापालिकेच्या डफरीन चौकातील अहिल्याबाई होळकर प्रसूतीगृहात 2004 पासून पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सुविधा नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांचे पाण्यासाठी हाल होतात.

प्रसूती विभाग दुर्लक्षित
95 बेड असलेला सिव्हिल वॉर्ड स्वच्छता, सोयीसुविधांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे.स्वच्छतागृहात सुविधा नसते. महिला रुग्णांची संख्या वाढली तर आवारातच गाद्या घालून सोय करावी लागते. एकीकडे बेड सुविधा आहे तर रुग्ण नाहीत. दुसरीकडे अपुरे बेड आणि रुग्ण अधिक अशी अवस्था आहे.

अडचणी आहेत
अत्यावस्थ असलेल्या केसेस या सिव्हिलकडे पाठविल्या जातात. आठ प्रसूतीगृहात सोनोग्राफीची सुविधा नाही.नव्याने दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही कमी आहे. पुरेशा सोयीसुविधा नसल्याने आरोग्य सेवा देताना अडचणी येतात. शिवाय मनुष्यबळाचा अभाव आहे.
-डॉ. सयाजी गायकवाड, महापालिका आरोग्य अधिकारी

कर्मचार्‍यांना समज
सिव्हिलकडे येणार्‍या रुग्णांचा ओढा अधिक आहे.याउलट रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी आहे. रुग्णसंख्या आणि बेड यांच्या तफावत निर्माण झाल्यानंतर कधीकधी गोंधळ उडतो. त्यामुळे कर्मचार्‍यांची चिडचिड होते. गैरवर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांना समज दिली जाईल.

-डॉ. अशोक शिंदे ,अधिष्ठाता सिव्हिल

प्रसूतीगृहांची नावे बेड
अहिल्याबाई होळकर 35
दाराशा प्रसूतीगृह 20
जिजामाता प्रसूतीगृह 10
भावना ऋषी प्रसूतीगृह 20
बॉईस प्रसूतीगृह 40
चाकोते प्रसूतीगृह 20
रामवाडी प्रसूतीगृह 10
साबळे प्रसूतीगृह 10

आरोग्य विभाग : जुलै 2013)
शुद्ध पिण्याच्या पाण्याची आहे गैरसोय
वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर नाही
स्वच्छतागृहे बनली रुग्णांसाठी गैरसोयीची
बेड व बेडशीटची अवस्था वाईट
गॅस गिझर असून दुरुस्तीअभावी बंद
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>3 सिझर करण्याची नाही सुविधा

मनपा रुग्णालयांना समस्यांचा विळखा
रुग्णांचे हाल
गर्भवती महिलांना प्रसूतीकाळात भावनिक आधार हवा असतो. पण रुग्णालयातील परिचारिका व महिला कर्मचार्‍यांकडून तसा आधार मिळत नाही. रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांना अक्षरश: शिव्यांनाच सामोरे जावे लागते. अगदी अश्लील भाषेत रुग्णांशी संवाद साधला जातो. त्यामुळे रुग्ण पुन्हा येत नाहीत.

वागणूक योग्य नाही
मी माझ्या बाळाला सिव्हिलमध्ये जन्म दिला. जेव्हा बाळंतकळा सुरू झाल्या तेव्हा विव्हळत असताना मला महिला कर्मचार्‍यांच्या शिव्या खाव्या लागल्या. त्या ऐकवत नाहीत. आया वाईट शब्दांत बोलतात. त्याचे वाईट वाटते. शासनाने आम्हाला दिलेला हक्क देणे गरजेचे आहे. तो देताना आनंदाने द्यावा.
-सावित्री घंटा ,गृहिणी, अशोक चौक

मानसिक ताण
बाळंतपण म्हणजे महिलांसाठी पुनर्जन्म असतो. अशावेळी अवतीभोवती वातावरण छान हवे. अशावेळी अपुलकीची वागणूक मिळायला हवी. महिला कर्मचार्‍यांना मानसिक ताण येऊ शकतो. त्याचा परिणाम कधी-कधी बाळंतपणावरही होऊ शकतो.
-शिवलीला अंटद, गृहिणी

मनपा प्रसूती केंद्रात सुविधांचा अभाव, सोनोग्राफी सुविधा नसल्याने महिलांचे होताहेत हाल, सेवा पुरवण्याकडे होतेय दुर्लक्ष, असुविधांमुळे शासकीय

शासकीय रुग्णालय
शासकीय रुग्णालयात बेडची संख्या अपुरी असल्याने अतिरिक्त रुग्णांना खाली बेड घालून व्यवस्था करावी लागते.