आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Mayer Alaka Rathod Call To Meeting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांनी बोलावली अंदाजपत्रकाची सभा; दोन दिवस होणार चर्चा,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा 30 मार्च रोजी सुरू होत आहे. 2013 चे अंदाजपत्रक सुमारे 720 कोटींचे असून, त्यावर दोन दिवस चर्चा होणार आहे. 31 मार्चला त्यास मंजुरी मिळेल. सभेचे पत्रक महापौर अलका राठोड यांनी काढले आहे. अंदाजपत्रकावर बोलण्यासाठी सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. मंगळवार ते गुरुवार दरम्यान भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगरसेवकांची बैठक विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी बोलावली. नगरसेवकांना अंदाजपत्रकाचा अभ्यास करता यावा म्हणून विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांना नगरसचिव कार्यालयाकडून अंदाजपत्रकाची पुस्तिका रविवारी वाटण्यात आली.

आयुक्त अजय सावरीकर यांनी स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर केले. समितीने 53 कोटींच्या कामांची वाढ करत ते 773 कोटींवर नेले. महापालिका सभागृहाकडे शिफारस करून मंजुरीसाठी 21 मार्च रोजी पाठवला. यंदा प्रथमच त्यावर दोन दिवस चर्चा होत आहे. सखोल व सविस्तर चर्चेसाठी सभा दोन दिवस घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने चर्चा घडवून आणली होती.