आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Misconduct In Written Tests

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखापरीक्षणाच्या 'आरशा'त दिसला पालिकेचा गैरकारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेचा कारभार की गैरकारभार असा प्रश्न उभा राहावा अशी स्थिती आहे. २०११-१२च्या आर्थिक लेखापरीक्षणात तब्बल १५८ त्रुटी आढळल्या आहेत. यात प्रामुख्याने कामकाजात अनियमितता, एकाच खर्चाबाबत दोन कागदांमध्ये तफावत, नियमबाह्य रोखीने रक्कम देणे आदी गैरप्रकार महापालिकेच्या २० विभागांच्या कामकाजात आढळले आहेत.
आयुक्त कार्यालयाने लेखापरीक्षणाचा अहवाल महापालिकेच्या सभागृहापुढे ठेवला आहे. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षक (मनपा) नवी मुंबई कार्यालयाने केले आहे. त्यांचा अहवाल महापालिकेस २२ मे २०१४ रोजी आला.
त्रुटींची पूर्तता केली जाईल
- शासनाने लेखापरीक्षणात त्रुटी काढल्या. पूर्तता करून त्यांची माहिती सभागृहापुढे ठेवली आहे. त्यानंतर सरकारकडे पाठवले जाईल.”
सुकेश गोडगे, मुख्य लेखापाल, महापालिका
एलबीटी : एस्कॉर्टची पावती पुस्तके लेखापरीक्षणास उपलब्ध केले नाहीत. पुस्तके छपाई निवेदनात अनियमितता.
विद्युतविभाग : खरेदीत अनियमितता.
यूसीडी: सुवर्णजयंती रोजगार योजनेतील रोकड वहीतील अनियमितता.
जन्म-मृत्यूविभाग : जमारकमेच्या लेखापरीक्षणाबाबत अनियमितता.
अतिक्रमण: आस्थापनाविभागावर झालेला अनावश्यक खर्च.
उद्यान: संभाजीतलाव येथील नौका विहार मत्स्यविक्री मक्त्यामध्ये अनियमितता.
झोपडपट्टी: घरतेथे शौचालय प्राप्त निधी खर्चात तफावत. गवसू विभागात अपहार.
महिला बालकल्याण : सभापतीअधिकारी यांच्या वाहनावरील खर्चाबाबत. संगणक प्रशिक्षणाबाबत.
हुतात्मा स्मृती मंदिर : खुर्चीदुरुस्ती भाड्याच्या जनरेटरचे लेखे उपलब्ध नाहीत.
आरोग्यविभाग : साहित्यखरेदीत गंभीर अनियमितता. अन्न परवाना विभागातील नर्सिंग होमच्या नोंदच्या वहीत त्रुटी.
नगर अभियंता : वाहनावरीलखर्चात अनियमितता. सलगरवस्ती येथील मुस्लिम कब्रस्तान सुरक्षा भिंत रस्ता करणे यात अनियमितता. गुडलक हाॅटेल ते राष्ट्रीय महामार्ग कामात अनियमितता. अक्कलकोट रोड, समाधान नगर, समता नगर, जयप्रकाश नगर भागातील रस्ते कामात अनियमितता. भगवान नगर घरकुल बांधकामात अनियमितता. नगर अभियंता, भांडार विभागातील नियमांच्या लेखे नोंदवह्या नियमानुसार नाहीत.
सार्वजनिक आरोग्य अभियंता : पाणीपुरवठाविभागातील वाहनाच्या लाॅगबुकात त्रुटी. पाइप खरेदीत अनियमितता. पाण्याच्या टाक्या बांधण्याबाबत.
संगणक विभाग : स्टेशनरी खरेदी निविदा करता तुकडे पाडून केली. जनन मृत्यूच्या नोंदीच्या कामामध्ये विलंब केल्याने दंडात्मक कारवाईबाबत. टॅबलेट खरेदी.
नगरसचिव : नगरसेवकपदाधिकारी यांचे दूरध्वनी लेटरपॅड छपाईवर नियमबाह्य खर्च. सर्वसाधारण सभेकडील प्रलंबित विषयावर निर्णय घेतले नाहीत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विभागवार आक्षेप...