आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation News In Divya Marathi

व्यापाऱ्यांना 'एलबीटी'तून 'अभय'; मनपाचे हवेतच कारवाईचे इशारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एलबीटीवरील दंड आणि व्याज माफ करणारी 'अभय योजना' व्यापऱ्यांच्या हिताची आहे. व्यापाऱ्यांनी वेळेवर एलबीटी भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या कार्यशाळेत दिला. प्रत्यक्षात महापालिकेकडे अद्यापही कोणत्या व्यापाऱ्यांकडून, कोणत्या वर्षासाठीची किती रककम येणे बाकी आहे, अशी माहितीच नसल्याचे समोर आले आहे.
'अभय योजने'ची माहिती व्यापाऱ्यांना देण्यासाठी महापालिकेने यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी कार्यशाळा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'या योजनेंतर्गत येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी आपापली विवरण पत्रे भरावीत अन्यथा त्यांच्यावर दंड आणि व्याजासहित रक्कम भरावी लागेल. तसेच यापुढे कोणालाही मुदतवाढ मिळणार नाही. या योजनेचा व्यापाऱ्यायांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी महापौर सुशील आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पक्षनेते संजय हेमगड्डी, उपायुक्त मायकलवार, बी. एम. चवरे आदी उपस्थित होते.
माहिती देण्यास टाळाटाळ
थकबाकीच्या नेमक्या माहितीचा अभाव एलबीटीची थकबाकी िकती, शहरातून अजून किती व्यापाऱ्यांचे विवरण पत्र येणार आहेत याबाबतीत पाहिजे तेवढी माहितीच थकबाकी वसूल करणाऱ्या महापालिका यंत्रणेकडे नाही. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, असता माहितीबाबत असमर्थता व्यक्त केली.
अभिनंदनाचा ठराव पण...
जाचकअटी शिथील करीत व्यापारी हिताची अभय योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव महापालिकेने करावा, असे मत राजू राठी यांनी व्यक्त केले. यावेळी पेंटप्पा गड्डम यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. पण यावर कसलेच भाष्य झाले नाही.