आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation News In Marathi, Budget, Divya Marathi, Solapur

पाणीपट्टीत 50 टक्के कपातीची शिफारस, निर्णय सभागृहापुढे..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचे 2013-2014 चे प्रशासकीय महसूल अंदाजपत्रक 570 कोटी, 62 लाख, 37 हजार रुपयांचे होते. यामध्ये स्थायी समितीने 35 कोटी रुपयांच्या वाढीची शिफारस करीत 605 कोटी 28 लाख 37 हजार रुपयांचे अंदाजपत्रक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी शनिवारी पाठविले. विशेष म्हणजे पाणीपट्टी पन्नास टक्के माफ करीत स्थायीने कुठलेही कर आणि दर वाढवले नाहीत.

महसुली जमा बाजूमध्ये आयुक्तांनी वीस कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित ठरवले होते. त्यामध्ये स्थायीने 80 लाख रुपयांची वाढ केली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त साहाय्यकारी अनुदान म्हणून स्थायीने 80 लाख रुपये सुचवले. आयातकर, मलनित्सारण कर, सांडपाणी विक्री, मंड्या वसुली, सर्वसाधारण कर, गाळेभाडे, गलिच्छ वस्ती सुधारणा आदी कर उत्पन्नात वाढीचा अंदाज केला आहे.

देखभाल, दुरुस्तीवर खर्च
शाळा, प्रसूतिगृह, दवाखाने, रंगरंगोटी, स्वच्छता, पार्किंग, गटारी दुरुस्ती, कूपनलिका दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती, शॉपिंग सेंटर दुरुस्ती, प्राणिसंग्रहालयाची देखभाल आदी अनेक बाबतीत प्रशासनाने खर्च दाखवले आणि स्थायीने वाढ दश्रवली. ही वाढ कोट्यवधी रुपयांची असली तरी प्रत्यक्षात त्याच कामासाठी खर्ची पडणे आणि त्याचा नागरिकांना लाभ होणे महत्वाचे आहे.

कपात केल्यास साडेबारा कोटींचा फटका
शहराला सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना शंभर टक्के पाणीपट्टी घेणे योग्य नाही. त्यामुळे 50 टक्के पाणीपट्टी माफ व्हावी, अशी सत्ताधारी नगरसेवकांनी सुचवली. सोलापूर शहराची वार्षिक पाणीपट्टी सुमारे 25 कोटी रुपये आहे. पन्नास टक्के पाणीपट्टी माफ केल्यानंतर महापालिकेला सुमारे साडे बारा कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे भरपाई अनधिकृत नळ शोध मोहिमेतून साडेसात कोटी आणि थकबाकी वसुली विशेष मोहिमेतून साडेसात कोटी रुपये वसूल करण्याचे विरोधी पक्षाने सुचवून हा विषय एकमताने मंजूर केला.
परिवहन खात्यास आधार
परिवहन खात्यास 10 कोटींचे आर्थिक सहाय्य प्रशासनाने सुचविले होते. स्थायीने त्यात 6 कोटींची कपात केली आहे. तर परिवहनकडील निवृत्त सेवकांचे पेन्शन व इतर देय रकमा देण्यासाठी प्रशासनाने काहीही न सुचविलेले असताना स्थायीने 8 कोटी सुचविले आहे.