सोलापूर - ऐनगणेशोत्सवाच्या काळात कामावर दांडी मारणाऱ्या हद्दवाढ विभागातील ४४ कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बडतर्फ केले.बडतर्फ झालेल्यांमध्ये २७ चावीवाल्यांचा समावेश आहे. यातील २२ जणांना रविवारी बडतर्फ केले होते, सोमवारी २२ जणांवर कारवाई केली. या कर्मचाऱ्यांनी २८ अॉगस्टपासून अचानक दांडी मारली होती. त्यांना शनिवारी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतरही ते सेवेत हजर झाले नाहीत. मनपा कायदा ३११ (२) (ब)न्वये महापालिका २२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ कर्मचारी (कंसात पद) रेवणप्पा लंगोटे (शिपाई), भालचंद्र भोवाळ, महादेव भरळे, निगप्पा तमशेट्टी, परशुराम हरळे, काशिनाथ गौडगाव, मल्लिकार्जुन मोहोळकर, रेवणसिध्द महमिकर, गौरीशंकर भरले, दयानंद कोळी, यशवंत पाटील, मारुती माने, पंडित शवेगार, दत्तात्रय राजमाने, कल्लप्पा मोकाशी, रामचंद्र साळुंके, राजशेखर पाटील, रेवणप्पा भोपळे, श्रीकांत शेवगार, चन्नप्पा हावडे, सुभाष मणकापुरे, म. नौशाद मुजावर, श्रीकांत कोरे, पंडित हत्तुरे, रत्नाकर हुक्केरी, मारुती कांबळे (सर्व चावीवाले), शंकर थोरात, स्वामीराव भावार्थी, यशवंत धायगोडे, शिवाजी इंगळे, श्रीमंत कोरे (वायरमन), शिवाजी तावरे, चंद्रकांत ख्याड, धर्मण्णा हत्तुरे, गजेंद्र कामशेट्टी (लॅम्प लायटर), रेवप्पा खुपसंगे, सत्तार बाडीवाले, सादीक हुच्चे, सोमनाथ स्वामी, हणमंत रूद्राक्षी, शिवानंद कडगंची, राजेंद्र कोरे, उमाकांत कोरे (कायम मजूर).