आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Tax Recovery Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच दिवसांत 18 लाख वसूल; वर्षाखेरपर्यंत 50 कोटींचे लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेच्या कर आकारणी विभागाने कारवाई करत पाच दिवसांत 18 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. वर्षाखेरपर्यंत 50 कोटी रुपये कर वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे कर वसुली पथक प्रमुख एन. बी. कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

एप्रिल 2012पासून आजपर्यंत 40 कोटी 22 लाख रुपये वसूल झाले आहेत. मागील वर्षी 40 कोटी 74 लाख रुपये वसुल झाले होते. काही दिवसापूर्वीच महापालिका आयुक्तांनी काम करा अन्यथा 25 टक्के पगार कपात करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यापद्धतीने कारवाई सुद्धा केली.

पाच दिवसांत 18 लाखांची वसुली : महापालिका कर आकारणी विभागाच्या कर आकारणी वसुली पथकाने पाच दिवसात 18 लाख तीन हजार 423 रुपये वसूल केले आहेत. 8 फेब्रुवारी : दोन लाख 36 हजार 440, 9 फेब्रुवारी : चार लाख 35 हजार 11 फे ब्रुवारी : तीन लाख 90 हजार 607, 12 फेब्रुवारी : तीन लाख 12 हजार 285, 13 फेब्रुवारी : चार लाख 29 हजार 91 रुपये. पाच दिवसात पाच नळ जोड तोडण्यात आली. तर एक गाळ्याला सिल केले.

सुटीच्या दिवशीही उत्तम वसुली : सुटीच्या दिवशीही पथकाने काम करून वसुली केली. 9 फेब्रुवारी रोजी दुसरा शनिवार होता. त्या दिवशी चार लाख 35 हजार रुपये वसूल केले.

दोन लाखांचा तत्काळ भरणा : गुरुनानक चौक परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील गाळेधारकांनी सील करण्याच्या भीतीने तत्काळ दोन लाख रुपये भरले. विडी घरकुल आणि उत्तर सदर बझार भागात जप्ती मोहीम राबवण्यात आली आणि येथून दोन लाखाची वसुली करण्यात आली.

या मोहिमेत कर संकलन प्रमुख पी. व्ही. थडसरे, वरिष्ठ मुख्य लेखनिक एस. एस. बुगडे, एन. बी. कुलकर्णी, उंडाळे, कल्याणशेट्टी, दर्गोपाटील, बागवान, मेघाचे, नरोटे, बडगु, के. के. म्हेत्रे, कोरबु, दोंतूल, सुरवसे, बोकेफोडे, दारफडे, झंपले, सोनकांबळे, वाघमारे, अनिल कापसे आदींचा समावेश होता.