आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Thousands Of Vacancies

राजकारण अधिकार्‍यांचे अन् खीळ उत्पन्नवाढीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एकीकडे महापालिकेतून सेवानिवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांची संख्या वाढत असतानाच रिक्त पदांची यादीही वाढू लागली आहे. रिक्त पदाची संख्या हजारावर येऊन ठेपली आहे. अधिकारी- पदाधिकारी वाद नवीन नाही, पण आता खुद्द सभागृहनेते महेश कोठे यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी अधिकारी प्रयत्न करत नाहीत, उलट पदाधिकार्‍यांमध्येच अंतर्गत राजकारण अधिक आहे, अशी टीका केली आहे.

महापालिका आस्थापनेवर 6385 पदे मंजूर असून त्यापैकी 5472 पदांवर कर्मचारी आहेत. 913 जागा रिक्त आहेत. उपायुक्त पी. वाय. बिराजदार यांच्यासह सहाजण गुरुवारी सेवानिवृत्त झाले. महापौर अलका राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात र्शी. कोठे यांच्या भाषणातून अधिकार्‍यांबाबतचा रोष बाहेर आला. पदोन्नत्यांमध्ये प्रशासनातूनच तांत्रिक आडकाठी आणली जात असल्याने विभाग प्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अंदाजपत्रक करताना अडचणी येत आहेत. उत्पन्न कमी येत असताना जास्त दाखवण्याची नामुष्की येते. करसंकलन वाढवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. पाण्याच्या वितरणात त्रुटी आहेत. शहरात एका नळावर पाणी घेणारी दहा कुटुंबे आणि हद्दवाढ भागात एका कुटुंबाला सारखेच बिल दिले जात आहे. हा दुजाभाव दूर करून अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे कोठे म्हणाले.

नियंत्रण का नाही
सभागृहनेते कोठे यांनी नेमकेपणाने अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठवले आहे. हे अनुभवातून आलेले बोल आहेत, पण आजवर या परिस्थितीवर नियंत्रण का ठेवले नाही, अधिकारी ऐकतात तरी कोणाचे? असे प्रo्न कार्यक्रम संपल्यानंतर चर्चेत होते.

प्रमुख पदे रिक्त : साहाय्यक आयुक्त (दोन), अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक नगर रचना, आरोग्य अधिकार, विधी सल्लागार
विभागप्रमुखांची रिक्त पदे: कर संकलन, कामगार कल्याण, यूसीडी प्रकल्प संचालक, बायोफार्मासिस्ट

शासनाकडे प्रस्ताव पाठवला
शासनाच्या आदेशाप्रमाणे रिक्त जागांची यादी शासनाकडे वेळोवेळी पाठवण्यात आली आहेत. शासनाच्या मंजुरीनंतर पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. अजित खंदारे, साहाय्यक आयुक्त (प्रशासन)