आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Will Take Possession Of 43 Acre Land Located At Bijapur Road

विजापूर रस्त्यावरील 43 एकर महापालिका घेणार ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विजापूर रस्ता येथील रेवणसिध्देश्वर मंदिर परिसतील 43 एकर जागा प्रकाश काशिनाथ गडदुरे यांच्यासह इतरांनी संगनमत करून बळकावली आहे. त्यांच्याविरुद्ध महापालिकेने सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फौजदारी गुन्हा दाखल झाला. ती जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

नगर रचना योजना क्रमांक चार अंतिम भूखंड क्रमांक 289 ही जागा टाऊन पार्क करण्यासाठी आरक्षित आहे. 1971 साली महापालिकेच्या ताब्यात शासनाकडून आली आहे. 17 हेक्टर 2598 चौ. मी. इतकी जागा असून त्याठिकाणी प्रकाश गडदुरेसह इतरांनी अतिक्रमण करून फेब्रुवारी 2013 पासून संगनमताने ताब्यात घेतली. त्या जागेवर विहीर खोदून, पत्र्याचे शेड मारले आणि पिकाची लागवड बेकायदेशीरपणे केली आहे. याप्रकरणी गडदुरे यांना महापालिकेने 22 मे 2013 रोजी नोटीस काढली. ती त्यांनी 12 जून 2013 रोजी स्वीकारली. त्यास गडदुरे यांनी लेखी उत्तर देत जागेवर हक्क सांगितला. ही जागा महापालिकेची असल्याने महापालिकेच्या वतीने अभियंता शांताराम मनोहर अवताडे यांनी प्रकाश गडदुरे यांच्या विरोधात फिर्याद दिली.

जागा ताब्यात घेणार
ती जागा मनपाच्या ताब्यात असून, त्या जागेवर प्राणिसंग्रहालय बांधण्यात येणार आहे. घुसखोरी करून अतिक्रमण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल केला. ती जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत.’’ शांताराम अवताडे, अभियंता, महापालिका

न्यायालयीन लढा लढू
कुळकायद्यानुसार ती जागा आमची आहे. न्यायालयाने तसा निकाल दिला. महापालिकेचा या जागेशी काही संबंध नाही. आम्ही न्यायालयीन लढा देणार आहोत.’’ प्रकाश गडदुरे