आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Create Aap, Related To Income Tax

नवा बदल : कर भरण्यासाठी महापालिका तयार करणार मोबाइल अॅप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संगणकीययुगात महापालिका नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शहरातील अडीच लाख मिळकतीचे सर्वेक्षण करत असून, त्यासाठी महापालिका पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. सदर कामाचा मक्ता सायबर टेक कंपनी (ठाणे) यांना देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका कंपनी अधिकारी यांची प्राथमिक बैठक सोमवारी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनात झाली. सर्व्हे केल्यानंतर नागरिकांना मिळकत कर आॅनलाइन भरता यावा म्हणून कंपनीच्या वतीन मोबाइल अॅप्स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कर भरणाऱ्यांना सोयीचे होणार आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामे, त्याच्या करांचा सर्व्हे करण्यासाठी महापालिका जीआयएस प्रणालीनुसार सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था पुणे या कंपनीस काम देण्यात आले होते. ते वेळेवर केले नाही म्हणून त्याऐवजी सायबर टेक कंपनी, ठाणे यांना जीआयएसचे काम देण्यात आले. त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च येणार आहे. पुढील वर्षात हे काम होणार आहे.

प्राथमिक बैठक
जीआयएसकामाच्या बाबत मनपा आयुक्त गुडेवार यांच्या दालनात सोमवारी बैठक झाली. यावेळी साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे, संगणक विभाग प्रमुख सचिन कांबळे, कंपनीचे विशाल बरगत आदी उपस्थित होते. २२ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

दीड वर्षात मोबाइल अॅप्स
*नागरिकांनामिळकत कर भरता यावा म्हणून सायबर टेक कंपनीच्या वतीने मोबाइल अॅप्स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मिळकत कर आॅनलाइन कोठूनही भरता येईल. या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा मनपासह नागरिकांना होणार आहे. सचिनकांबळे, मनपासंगणक विभागप्रमुख
कर भरण्यासाठी मोबाइल अॅप्स
जीआयएसच्याकामानुसार शहरातील मिळकतीचे सर्व्हे केल्यानंतर त्यांची माहिती संगणकावर असणार आहे. प्रत्येक मिळकतीस युनिक कोड मिळेल. त्यावर नागरिकांना मिळकत भरण्यासाठी कंपनीकडून मोबाइल अॅप्स तयार करण्यात येणार असून, त्यावरून आॅनलाइन टॅक्स नागरिकांना भरता येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांची सोय होणार आहे.
१५ प्रकारची माहिती
जीआयएससर्व्हेत मिळकत सर्व्हे, पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, खुल्या जागा, प्रार्थना स्थळ, शाळा, महाविद्यालय, खासगी शासकीय खुली जागा आदी १५ प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाला एखाद्या योजनेची तत्काळ माहिती देण्यासाठी याचा फायदा होईल.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न
सायबरटेक कंपनीला यापूर्वी आरोग्य िनयोजन आणि बेंगलोर नेटवर्कसाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. तिसरा पुरस्कार सोलापुरातील जीआयएस कामासाठी मिळवण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. तसेच मनपा या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.