आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकांना खुश करण्याचा फंडा; कर, दंड रद्द तर सराफांना सूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महापालिकेत सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी लोकांना खुश करण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने लोकानुनयावर भर देण्यात आल्याचे शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत दिसून आले.
ज्या भागामध्ये ड्रेनेजची सुविधा नाही तेथे यूजर चाज्रेस नाही, करावर आकारण्यात येत असलेला दोन टक्के दंड रद्द करण्यात येणार आणि सोन्याचे दागिने, हिरे, माणिक, पाचूवर एलबीटी चार टक्के न घेता अर्धा टक्काच घ्यावा, असे तीन महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अलका राठोड होत्या.
विविध विकासकामांना मंजुरी
शहरात विविध ठिकाणी विद्युत पोल, सोडियम व्हेपर, तारा ओढणे, क्रॉँकिट रस्ता करणे, नामकरण, ड्रेनेज लाइन टाकणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करणे, आरसीएचकडील सेवक वर्गाच्या मानधनात वाढ करणे, सर्कस भाडे निश्चिती, नाला बांधणे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविणे आदी विषयांनाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
सोलापुरात सर्वांकडून यूजर चाज्रेस वसुल केले जात होते. याबाबत अनेकवेळा निर्णय होऊनही यूजर चाज्रेसची वसुली सुरू झाली होती. ज्या भागात ड्रेनेजची सुविधा आहे त्याच भागात यूजर चाज्रेस वसूल करायचा, असा निर्णय शुक्रवारी एकमताने घेण्यात आला.

रंगल्या महेश कोठे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या गप्पा
टक्के दंड लावताना सभागृहाची मंजुरी घेतली होती का, असा प्रश्न जगदीश पाटील यांनी उपस्थित केला. उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ही बाब प्रशासकीय असून सभागृहाच्या मंजुरीची आवश्यकता नाही असे उत्तर दिले. आयुक्तांनी खुलासा केल्यानंतर या विषयाला पूर्णविराम मिळाला.
डॉ. कुमार यांनी काम न करता घेतला दोन वर्षांचा पगार
महापालिका आरोग्य विभागातील डॉ. प्रसाद कुमार हे 2010 ते 2013 या कालावधीमध्ये पुण्यात डिप्लोमा करत होते. त्या कालावधीत महापालिकेत कार्यरत नसतानाही त्यांनी दोन वष्रे पगार उचलल्याची माहिती मिळाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. वैद्य यांनी सभागृहात सांगितले. या विषयाला अँड. यू. एन. बेरिया यांनी हात घातला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाकालगत असलेल्या उड्डाणपुलास ‘स्व. बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्याचा विषय देवेंद्र कोठे आणि सुभाष डांगे यांनी आणला. हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. ‘महेश कोठे शिवसेनेत येणार आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. अण्णांच्या मनात ठाकरे प्रेम उमलतंय ही खूप चांगली बाब आहे. आता ‘मध्य’मधील नगरसेवकांना जास्त निधी द्या, सेनेतून लवकर आमदार व्हा’ असे आवाहन भाजपच्या जगदीश पाटील यांनी केले. सभा सुरू असतानाच कोठे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या विषयावर अर्धा तास गप्पा रंगल्या. यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही हसू आवरता आले नाही.