आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Nagnath Maharaj Yatra Starts From Tomorrow

श्री नागनाथ महाराज यात्रा उद्यापासून सुरू; तांदुळवाडीत जलकुंभ मिरवणूक, शुक्रवारी छबिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तांदुळवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेस बुधवारपासून (दि. २२) प्रारंभ होत आहे. तीनदिवसीय यात्रेनिमित्त २२ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंगळवारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वी यांच्या शुभहस्ते मंदिर कळसारोहणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष सुनील स्वामी यांनी दिली.

बुधवारपासून तीन दिवसीय यात्रेस प्रारंभ होईल. सायंकाळी मानकरी चनशेट्टी वाड्यामध्ये नंदीध्वज स्थापना होईल. महाआरतीनंतर रात्री वाजता प्रमुख मार्गावरून मानाचे तीनही नंदीध्वज बसवण्णा भेट होईल. गुरुवारी पहाटे श्रीच्या मूर्तीस महारूद्राभिषेक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. सकाळी वाजता मानाच्या तीनही नंदीध्वज, पालखी महालिंगराया पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये करमणुकीचे विविध कलाप्रकार असतील. सायंकाळी वाजता कुस्तीचा कार्यक्रम होईल.

आज कळसारोहण

यात्रेच्या एक दिवस अगोदर नागनाथ महाराज मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, रेणुक शिवाचार्य महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते होणर आहे. सकाळी वाजता होम हवन, वाजता मूर्ती प्रतिष्ठापना आणि दुपारी वाजता धर्मसभा आशीर्वचन होईल. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.