आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Nagri Industrial Co opretive Bank Is Working

‘त्यांना’ नाहीत सुट्या.. सहा दिवसांत ठेवीदारांना वाटली दहा कोटींची रक्कम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - 25 जानेवारीपासून जोडून आलेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे बहुतांश शासकीय अधिकारी व कर्मचारी आणखी रजा टाकून निवांत झाले. परंतु एका अधिकार्‍याला या सुट्या नाहीत. या तीन दिवसांच्या सुट्यांमध्ये ते फायलींमध्ये गढून गेले. फक्त सह्याच करत राहिले. रविवारी रात्रीपर्यंत त्यांच्या सह्यांचे काम सुरूच होते.

विसजिर्त सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेचे अवसायक (लिक्विडेटर) संजय राऊत यांचे हे काम. बँकेतील 81 हजार ठेवीदारांना रकमा देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. ठेवरकमांच्या दाव्याचे अर्ज भरून घेतले.

अल्फाबेटिकल आडनावांना संबंधित तारखांना धनादेश देण्याचे लेखी सांगितले. त्यानुसार 21 जानेवारीपासून कामास सुरुवात झाली. 25 पासून तीन दिवसांच्या सुट्या आल्या. 28 जानेवारीपासून पुन्हा धनादेश देण्याच्या तारखा आहेत. बँकेच्या पुणे, नगरसह 16 शाखांमधून त्याचे काम आहे. ज्यांच्या आडनावांचा क्रमांक लागतो, त्यांच्या धनादेशांवर सह्या ठोकण्याचे काम र्शी. राऊत गेल्या तीन दिवसांपासून करत आहेत. अर्थातच या कामात बँकेतील कर्मचारीही त्यांच्या सोबत आहेतच.

सहकार खात्याने बँकेवर अवसायक मंडळाची नियुक्ती केली असून, तीन सदस्यांचे हे मंडळ आहे. र्शी. राऊत त्याचे अध्यक्ष आहेत. ‘डिपॉझीट इन्शुरन्स अँण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) कडून लाखाच्या आतील विमापात्र ठेवरकमा आल्या आहेत. सुमारे 65 कोटी रुपयांचे वाटप हे अवसायक मंडळासमोरील आव्हानाचे काम आहे. प्रत्येक धनादेशावर र्शी. राऊत यांची सही आणि इतर दोन सदस्यांपैकी एकाची असे धनादेश तयार करून संबंधित शाखेत पाठवण्याचे काम जामाने सुरू आहे. 21 जानेवारीपासून या मंडळाने 4 हजार 479 ठेवीदारांना 10 कोटी 48 लाख रुपयांचे वाटप केले आहे.

50 रुपयांची ठेवही दिली
मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील बँकेच्या शाखेत सिद्धाराम दोडमनी या खातेदाराची 50 रुपयांची रक्कम बँकेत आहे. ती परत मिळण्यासाठी दोडमनी यांनी दावा अर्ज भरून दिला. तो मंजूर झाला असून, रविवारी त्यांच्या धनादेशावरही सही झाली. नगरच्या शाखेतील संजय छबुराव हलसे यांच्या खात्यावर 62 रुपये 74 पैशांची रक्कम होती. त्याचेही धनादेश तयार झाले. हे धनादेश वटवण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत ‘झिरो बॅलन्स’ने खाते उघडता येते.

ठेवीदारांच्या सेवेत
ठेवरकमा मिळण्यात ठेवीदारांना कमीत कमी त्रास व्हावा, या उद्देशाने नियोजन केले. त्यानुसार धनादेश देणे भागच आहे. सुट्या बघून कसे चालेल? घरी पाहुणे आले, मुलगा गड्डय़ावर जायचे म्हणतो. पत्नीला सांगून त्यांची सोय केली. मी मात्र ठेवीदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बँकेत बसून आहे.’’
संजय राऊत, अवसायक